‘धर्मवीर २’ या चित्रपटातून नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे प्रसाद ओक हा आहे. नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिका अशा विविध माध्यमातून प्रसाद ओक प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो आता मात्र त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त मानधन प्रसाद ओकला मिळतं का?

काही दिवसांपूर्वी प्रसाद ओकने ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला असे विचारण्यात आले की, आम्हाला असे समजले आहे की सध्या तू मराठी इंडस्ट्रीमधला सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहेस. त्यावर उत्तर देताना प्रसाद ओकने म्हटले, “हा प्रश्न तुम्ही दोन व्यक्तींना विचारायला हवा. एक तर मंजिरी ओक, कारण तीच माझा सगळा व्यवहार सांभाळते आणि दुसरा मंगेश देसाई, जो धर्मवीर २ चा निर्माता आहे.

south star was first Indian to charge 1 crore per film
अमिताभ बच्चन, शाहरुख-सलमान खान नव्हे तर ‘हा’ आहे एक कोटी मानधन घेणारा पहिला भारतीय अभिनेता
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Pushkar Jog
“मी माझ्या मुलीला फिल्म इंडस्टीमध्ये आणणार नाही”, पुष्कर जोगचं ठाम मत; ‘हा’ निर्णय घेण्यामागचं कारण काय?
The Forgotten Hero from Kapoor family Trilok Kapoor
कपूर कुटुंबातील पहिला पण विस्मृतीत गेलेला स्टार, दिले होते अनेक हिट सिनेमे
Stree 2 fame Shraddha Kapoor might also join telugu allu arjun much awaited pushpa 2 movie
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात स्त्रीची एन्ट्री? श्रद्धा कपूर घेणार ‘या’ अभिनेत्रीची जागा
akshay kumar
फक्त एक चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अक्षय कुमारचा केलेला अपमान? अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
Mahesh Manjrekar Reaction on Adinath Kothare Paani Movie
“विषय लीलया पेलला”, ‘पाणी’ चित्रपटावर प्रतिक्रिया देताना महेश मांजरेकरांनी आदिनाथ कोठारेचं केलं कौतुक अन् आजकालच्या अभिनेत्रींना दिला सल्ला
Karishma Kappor And Raj Kapoor
‘या’ कारणामुळे करिश्मा कपूर होती राज कपूर यांची लाडकी नात; करीनानेच केला खुलासा, म्हणाली…

“पण प्रश्नाचं उत्तर देताना मला असं सांगायला आवडेल की मी सगळ्यात जास्त मानधन घेणारा आहे का? यापेक्षा मला सगळ्यात जास्त पाहिलं जातं का, यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. लोकांकडून माझ्याबद्दल सगळ्यात जास्त वाचलं गेलंय का, मी सगळ्यात जास्त वेड लावणारा अभिनेता आहे का, हे पाहण्यामध्ये मला जास्त उत्सुकता आहे. तो काही फार महत्वाचा मुद्दा नाही.”

हेही वाचा: सारा अली खान पुन्हा प्रेमात, ‘या’ युवा नेत्याला करतेय डेट? केदारनाथमधील व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

जेव्हा आपण जेव्हा श्रीमंत कॅटागरीमध्ये जेव्हा जातो, तेव्हा घरी प्राणी असणं किंवा ब्लॅक कॉफी पिणं या स्टेटस दाखवणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या आपोआप येत जातात तुमच्या व्यक्तीमत्वामध्ये येत जातात. कारण- टपरीवरचा चहा तितकाच आवडू शकतोच की, तरीसुद्धा आपण ब्लॅक कॉफी मागतो का? यावर उत्तर देताना अभिनेत्याने म्हटले, “मुळात जेव्हा भूक भागवायला लागतात तेवढे पैसे नव्हते आणि तेवढं अन्न घेण्याची ऐपत नव्हती. तर ती भूक मारण्याकरिता ब्लॅक कॉफी प्यायला लागलो. कॉफीने भूक मरते. श्रीमंती दाखवण्यासाठी ब्लॅक कॉफी हे आज मी पहिल्यांदा ऐकतोय, हे मला माहितीसुद्धा नाही. मी भूक मारण्यासाठी मी ब्लॅक कॉफी प्यायला लागलो, सवय लागली, ती आजपर्यंत कायम आहे.”

दरम्यान, प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेला ‘धर्मवीर २’ हा आता प्रदर्शित झालेला आहे. लवकरच अभिनेता ‘रीलस्टार’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘जिलबी’ अशा चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.