आपल्या दमदार अभिनयासह दिग्दर्शनाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता प्रसाद ओक नेहमी चर्चेत असतो. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. प्रसादसाठी २०२४ या नवीन वर्षाची सुरुवात खूप खास होती. कारण या नवीन वर्षांची सुरुवात ओक कुटुंबाने नव्या घरातून केली.

१ जानेवारी २०२४ला प्रसादने इन्स्टाग्रामवर नव्या घराचा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. या व्हिडीओतून प्रसादने नव्या घराची पहिली झलक दाखवली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसादच्या नव्या घरी भेट दिली. वास्तू शांतीच्या दिवशी प्रसादने मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केलं होतं. प्रसादच्या शब्दाचा मान ठेवत एकनाथ शिंदेंनी ६ जानेवारीला त्याच्या नव्या घरी उपस्थिती लावली. या खास क्षणाचे अभिनेत्याने नुकतेच फोटो शेअर करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : ‘महायुतीला किती जागा मिळतील?’ एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही…”

हेही वाचा – ‘तू चाल पुढं’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

प्रसादने फोटो शेअर करत लिहिल आहे, “मुख्यमंत्री साहेब…! माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देऊन…तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तू शांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात. कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्या बरोबर बसलात, जेवलात… नीट निरखून आख्खं घर पाहिलंत…हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीनं ‘माणूस’ जोडता आहात ते पाहता ‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा…आम्ही चालवू हा पुढे वारसा’ हे शब्द तंतोतंत खरे करताय असंच वाटलं…साहेब…मनःपुर्वक आभार…ओक कुटुंबीय.”

हेही वाचा – राम मंदिरासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीची मोठी घोषणा, HanuMan चित्रपटाच्या तिकिटातील पैशातून करणार ‘इतके’ दान

दरम्यान, प्रसादच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, या वर्षात त्याचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘धर्मवीर २’, ‘वडापाव’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘महापरिनिर्वाण’ , ‘रीलस्टार’ असे बरेच प्रसादचे चित्रपट या नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहेत.