मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला स्वप्नील जोशी याचा आज वाढदिवस आहे. बालकलाकार ते लोकप्रिय अभिनेता हा त्याचा प्रवास अत्यंत रंजक आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’, ‘कृष्णा’ या मालिकांमधून तो घराघरात पोहोचला. त्यानंतर स्वप्नीलने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्याचे बरेच चित्रपट सुपरहिट ठरले. काही चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. एवढंच नाहीतर ‘समांतर’ या वेब सीरिजमधून आपल्या दमदार अभिनयाने स्वप्नीलने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. अशा या लोकप्रिय अभिनेत्याला आज वाढदिवसानिमित्ताने दिग्दर्शक, अभिनेता प्रसाद ओक खास शुभेच्छा देत होता. पण काहीतरी भलतंच घडलं? याचा व्हिडीओ प्रसादने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा – “दुर्दैवाने होतं ते…” ‘विनाकारण राजकारण’साठी पुरस्कार मिळाल्यानंतर रुपाली भोसले असं का म्हणाली?

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…
Lakhat Ek Amcha Dada actors dance video
Video : झापुक झुपूक…! ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा जबरदस्त डान्स; सर्वत्र होतंय कौतुक

“जिलबी सारख्या गोड गोड शुभेच्छा” असं कॅप्शन लिहीत प्रसाद ओकने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, प्रसाद वाढदिवसानिमित्ताने स्वप्नीलला खास शुभेच्छा देताना दिसत आहे. पण यादरम्यान स्वप्नीलच मधेच येतो. त्यानंतर प्रसाद त्याला म्हणतो, “तू बरा आहेस ना?” तर स्वप्नील विचारतो, “म्हणजे?” मग प्रसाद म्हणतो, “अरे इथे तूच का आलास? मी तुलाच वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय.” स्वप्नील म्हणतो, “अरे तिकडे का शुभेच्छा देतोय? आता मी समोर आहे ना, मला शुभेच्छा दे ना…” प्रसाद म्हणतो, “समोरून.. त्यांनी काही होत नाही. समोर माणूस आला, मिठ्ठी मारली, शुभेच्छा दिल्या त्यांनी काहीही होत नाही. यातून समाधान मिळत नाही. सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या पाहिजेत. तू जा.”

हेही वाचा – वडील होते सुपरस्टार, आई आहे प्रसिद्ध अभिनेत्री; ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का?

प्रसाद ओकच्या या मार्मिक आणि मजेशीर व्हिडीओवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी स्वप्नीलच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमृता खानविलकर, श्रृती मराठे, सुखदा खांडकेकर, नम्रता संभेराव अशा बऱ्याच कलाकारमंडळींनी स्वप्नीलला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – खलनायिकेची भूमिका साकारल्यामुळे कधी प्रेक्षकांचा वाईट अनुभव आला का? रुपाली भोसले म्हणाली, “मला खूप….”

दरम्यान, प्रसाद आणि स्वप्नील ‘जिलबी’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. या चित्रपटात दोघांच्या साथीला अभिनेत्री शिवानी सुर्वे पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे.

Story img Loader