नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये अभिनेता प्रसाद ओकने आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली आहे. अभिनयाबरोबरच प्रसाद उत्तम दिग्दर्शक म्हणूनही ओळखला जातो. सध्या अभिनेता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Tabu Birthday Special: तब्बू – अनवट वाटेवरची वलयांकित नायिका

प्रसाद ओकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर त्याने मंजिरीबरोबर ७ जानेवारी १९९८ मध्ये लग्न केलं. यावर्षी त्यांनी लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा केला होता. प्रसाद-मंजिरी यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे मजेशीर, काही वेळा रोमँटिक असे व्हिडीओ शेअर करत असतात. प्रसादने नुकताच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता बायकोची मजेशीररित्या तक्रार करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Tabu Birthday : तब्बूसाठीच लिहिला गेला होता ‘चांदनी बार’, तिच्या करीअरला कलाटणी देणारा किस्सा!

प्रसाद व्हिडीओमध्ये म्हणतो, “बायको हे खूप गोंधळात टाकणारं प्रकरण आहे राव…तिला पैसे सेव्ह करायचे असतात पण, त्याचवेळी तिला महागडे कपडे घ्यायचे असतात. ती महाग कपडे घेते…तरीही पार्टीची वेळ आल्यावर म्हणते, माझ्याकडे घालायला कपडेच नाहीत. तिच्याकडे घालायला कपडे नसतात पण, पार्टीच्या वेळेला ती तयार भारी होते. एवढी सुंदर दिसत असूनही तिला हे सगळं आवडलेलं नसतंच. तरी तिची इच्छा असते की, नवऱ्याने आपलं कौतुक केलं पाहिजे. नवऱ्याने कौतुक केलं तरीही हे खरं कौतुक आहे की खोटं यावर तिचा विश्वास नसतो…काय करायचं?” या व्हिडीओला प्रसादने “सत्यघटनेवर आधारित…” असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : “मी देखील त्यातलीच एक…”, हेमांगी कवीने मागितली जाहीर माफी, कारण…

प्रसादच्या या व्हिडीओवर कलाविश्वातील अनेक कलाकारांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. संकर्षण कऱ्हाडेने मी हे नाटकांत वापरू का? असं अभिनेत्याला विचारलं आहे. याशिवाय प्रसादची पत्नी मंजिरी ओकने “प्रसाद खूपच सुंदर…बाकी जे बोलत आहेस त्यात मला अजिबात रस नाही” अशी कमेंट करत नवऱ्याची चेष्टा केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad oak shared video on wife nature manjiri oak commented on post sva 00