Prasad Oak New Car : आपल्याकडे हक्काचं घर आणि फिरण्यासाठी छानशी गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी नवीन गाड्या, घरं खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. आता यात प्रसाद ओकचं नाव जोडलं गेलं आहे. मात्र, प्रसादने स्वत: गाडी खरेदी केली नसून त्याच्या लाडक्या लेकाने अभिनेत्याला ही कार गिफ्ट दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रसाद ओकला ( Prasad Oak ) मयंक आणि सार्थक अशी दोन मुलं आहेत. अभिनेत्याला सार्थकने गिफ्ट म्हणून खास BMW कार दिली आहे. नवीन गाडी घरात आल्यावर प्रसादची पत्नी मंजिरी ओकने खास पोस्ट शेअर करत आपल्या दोन्ही मुलांचं कौतुक केलं आहे. या पोस्टबरोबर २२ वर्षांआधीचा फोटो शेअर करत तिने एका जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. प्रसादची पत्नी पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली आहे जाणून घेऊयात…
हेही वाचा : The Buckingham Murders : लहान मुलाचा खून अन् ५ संशयित! खऱ्या आरोपीला कसं शोधणार करीना कपूर? पाहा ट्रेलर
मंजिरी ओकची पोस्ट
सार्थक जेव्हा गोष्ट तुमच्या बाबतीतली यायची… तेव्हा आपला बाबा तसा थोडा भित्राच होता ( अजूनही आहे ). तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला ( म्हणजे ३ सप्टेंबर २००२ ) जरा मी मागे लागले म्हणून बाबाची तयारी नसताना त्यानी तुला ही सायकल सरप्राइज गिफ्ट म्हणून आणली होती पण त्याला काळजी की, तू ती चालवताना पडलास तर? तुला लागलं तर ? म्हणून कित्येक दिवस त्याने तुला ती सायकल घराखाली नेऊ पण दिली नाही . (अर्थात आपण हळूच जायचो तो नसताना )
त्यावर बसायचं कसं हे पण तुला कळत नव्हतं. मात्र, तू बाबाला ती पहिल्यांदा चालवून दाखवल्या नंतरचा जो आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता अगदी तोच आणि तसाच आनंद ( लहान मुलासारखा ) आज बाबाच्या चेहऱ्यावर आहे.. त्याचं कारण म्हणजे, आज २२ वर्षांनी ( ३ सप्टेंबर २०२४ ) तू बाबाला ही मोठ्ठी गाडी सरप्राइज गिफ्ट दिलीस… मी नको म्हणाले, तर तू म्हणालास की बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही. ( त्या ऐवजी छोटं घर घेऊ असंच म्हणेल ).माझ्याकडे शब्द नाहीयेत सार्थक… फक्त एवढच सांगते की खूप खूप अभिमान वाटतो तुझा आणि मयंकचा पण…!!!
खूप मोठ्ठा हो
स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
“B”est
“M”any
“W”ishes
हेही वाचा : तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी; अप्पी ऑफएअर होणार?
मंजिरीने शेअर केलेल्या या पोस्टवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रसाद ओकने ( Prasad Oak ) यावर “थँक्स अ लॉट डिअर सार्थक खूप खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा” अशी कमेंट करत लेकाचे आभार मानले आहेत. अमृता खानविलकर, क्रांती रेडकर, समीर चौघुले, गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप, अमेय वाघ, विकास पाटील, शशांक केतकर, अभिजीत खांडकेकर, ऋजुता देशमुख, भार्गवी चिरमुले अशा असंख्य कलाकारांनी पोस्टवर कमेंट करत प्रसाद व त्याचा मुलगा सार्थक यांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, प्रसादच्या ( Prasad Oak ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर आता लवकरच तो ‘धर्मवीर २’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या २७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.