मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने मनोरंजन विश्वात अभिनय व कौशल्याच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. नाटकापासून अभिनयातील करिअरला सुरुवात केलेला प्रसाद आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयाबरोबरच प्रसादने अनेक चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे. ‘चंद्रमुखी’, ‘हिरकणी’, ‘कच्चा लिंबू’, ‘हाय काय नाय काय’ यांसारखे चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत.

२०१७ साली प्रदर्शित झालेल्या प्रसादच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे ‘कच्चा लिंबू’ फ्लॉप ठरला होता. ‘कच्चा लिंबू’च्या अपयशानंतर प्रसाद ओकला जबर धक्का बसला होता. ‘छापा काटा’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओकने याबाबत भाष्य केलं आहे.

Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
tripti dimri aashiquie 3 exit anurag basu
बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

हेही वाचा>> “कुंकू पण पांढऱ्या रंगाचं लावायचं होतं”, लग्नातील ‘त्या’ व्हिडीओमुळे अनन्या पांडेच्या बहिणीवर नेटकरी संतप्त, म्हणाले “बॉलिवूडमुळे…”

प्रसाद म्हणाला, “कच्चा लिंबू चित्रपटाच्या स्क्रिप्टवर मी व चिन्मय मांडलेकरने जवळपास तीन वर्ष काम केलं होतं. काहीतरी वेगळं देण्याचा एक संदेश देण्याचा प्रयत्न मी या चित्रपटातून केला होता. पण ती दाहकता बघायची लोकांची मानसिकता नव्हती. आज जर कच्चा लिंबू आला असता, तर १०० टक्के चित्रपट चालला असता. कारण, ओटीटीमुळे लोकांना दाहक वास्तव बघायची सवय झाली आहे. कच्चा लिंबूचा काळ चुकला, असं मला वाटतं”.

हेही वाचा>> “चांगला माणूस पण वाईट…” सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने कॉमेडियन कपिल शर्माबाबत केलेलं विधान चर्चेत

“‘कच्चा लिंबू’ चित्रपटाच्या अपयशानंतर फार वाईट वाटलं होतं. निर्मात्यांनी प्रचंड पैसे लावले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आम्ही घेतलेल्या कष्टाचं चीज झालं. पण तेव्हा मी प्रचंड खचलो होतो. चार ते पाच दिवस जेवलो नव्हतो. एक अन्नाचा कणही माझ्या पोटात गेला नव्हता. लोकांना हे का बघायचं नाही? असा प्रश्न मला पडला होता”, असंही प्रसादने सांगितलं.

हेही वाचा>> “सेक्सी व्हिडीओ पाठव” म्हणणाऱ्या नेटकऱ्याला मराठी अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली “तुझ्या…”

पुढे तो म्हणाला, “दिव्यांग अपत्य असलेल्या पालकांसाठी बाहेरच्या देशात कोर्स असतात. आज आपल्या कार्यक्रमात असं एखादं मुल आलं तर आपण त्याकडे कसं पाहतो? त्याच्या आईवडिलांना या सगळ्याचा जास्त त्रास होतो. ते दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला होता. पण शेवटी प्रत्येक कलाकृती नशीब घेऊन येत असते. ते चालणं न चालणं हे शेवटी प्रेक्षकांच्या हातात असतं”.

Story img Loader