अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक नवनवीन कलाकृती घेऊन येत प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करत असतो. प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता चित्रपटातून पडद्यावर तर कधी पडद्यामागून दिग्दर्शकाच्या भूमिकेत राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. गेल्यावर्षी (२०२४) प्रसादने ‘धर्मवीर २’ मधून दमदार अभिनयाचे प्रदर्शन करत पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली. प्रसाद ओक दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार असून मराठीतील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाची भूमिका साकारणार आहे. प्रसाद मराठी चित्रपटसृष्टी उभी करण्यात मोलाचा वाटा असणारे निर्माते, दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर ही बातमी शेअर केली आहे. यात बाबुराव पेंटर यांचा फोटो असून प्रसाद ओक बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार असे लिहिले आहे. या बरोबरच या पोस्टला एक कॅप्शन देण्यात आले आहे. “मराठी चित्रपटसृष्टी उभी करण्यात मोलाचा वाटा असणारी अनेक व्यक्तिमत्व होऊन गेली. त्यातलंच एक महत्वाचं आणि मानाचं नाव म्हणजे “बाबुराव पेंटर”. “बाबुराव पेंटर“ यांच्या जीवनावर आधारित एक भव्य दिव्य कलाकृती निर्माण होत आहे. मदन माने आणि त्यांची संपूर्ण टीम ही कलाकृती निर्माण करण्यासाठी अविरत झटत आहे…!!!” अशी माहिती कॅप्शन मधून देण्यात आली आहे.

हेही वाचा…ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा

प्रसादने पुढे लिहिले, “चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, इंजिनियर, छायाचित्रकार अशा अनेक बाजू लिलया सांभाळणारा हा अवलिया म्हणजेच “बाबूराव पेंटर”. “बाबूराव पेंटर” यांची ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री नटराजाचा आणि गणपती बाप्पाचा मला मिळालेला आशीर्वाद आहे असं मी मानतो. ही भूमिका साकारण्याची संधी मला देणारे आमचे दिग्दर्शक मदन माने यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो…!!!”

याच पोस्टमध्ये प्रसादने पुढे लिहिले, “माझ्या आजपर्यंत च्या सर्व कलाकृतींवर आपण मायबाप रसिकांनी जसं प्रेम केलंत… जसा आशीर्वाद दिलात… तसंच प्रेम आणि आशीर्वाद या ही भूमिकेला आणि कलाकृतीला मिळो हीच रसिक मायबाप चरणी प्रार्थना…!!! या चित्रपटाबद्दलची सविस्तर माहिती आम्ही लवकरच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू…!!!”

हेही वाचा…Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…

प्रसादसाठी अभिनेता म्हणून हे वर्ष खास असणार आहे. त्याचा ‘जिलेबी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शत होणार आहे तर याचवर्षी मे महिन्यात त्याचा ‘गुलकंद’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही सिनेमात तो मुख्य भूमिकेत आहे. तर तो सध्या दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्यावरील बायोपिकवर काम करत असून तो या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या एप्रिल महिन्यात प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला – सुजीत’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad oak to portray baburao painter in upcoming marathi biopic psg