मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता व दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओकला ओळखलं जातं. तो सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अभिनयाशिवाय प्रसाद ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावत आहे. त्याने व त्याची पत्नी मंजिरीने इन्स्टाग्रामवर नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
संजू राठोडच्या “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल” या गाण्याची सध्या प्रचंड क्रेझ निर्माण झाली असून, रील्सवर या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. सामान्य लोकांपासून ते मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर व्हिडीओ बनवून डान्स करत असल्याचं गेल्या काही दिवसात पाहायला मिळालं. परंतु, प्रसाद आणि मंजिरीने या व्हायरल गाण्यावर काहीसा हटके व्हिडीओ शेअर करून लक्ष वेधलं आहे.
मंजिरीने “गुलाबी साडी…” या गाण्यावर डान्स करताना काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. बायकोचा डान्स पाहून प्रसाद म्हणतो, “हा खरा गुलाबी रंग आहे.” एकंदर “गुलाबी साडी या गाण्यात गुलाबी रंगाचा उल्लेख असूनही तू वेगळ्याच रंगाचा ड्रेस परिधान करून डान्स करत आहेस” असं अभिनेत्याने बायकोला सूचित केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा : Video : रोमँटिक डेट, गेटवे ऑफ इंडियाला सेलिब्रेशन अन्…; अमृता खानविलकरची पती हिमांशूसाठी खास पोस्ट
“फक्त गुलाबीवर का चिडला हा? साडी तरी कुठे आहे?” असं मजेशीर कॅप्शन मंजिरीने या व्हिडीओला दिलं आहे. प्रसाद-मंजिरीच्या या व्हिडीओवर सध्या नेटकरी खळखळून हसत आहेत. याशिवाय नम्रता संभेराव, अमृता खानविलकर, दीप्ती देवी, त्रिशूल मराठे या कलाकारांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.