अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने काही दिवसांपूर्वीच “वडापाव : एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी” या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये सुरु झाले आहे. चित्रपटाच्या निमित्ताने यात महत्त्वाच्या भूमिका साकारणारे सर्व कलाकार लंडनला रवाना झाले आहे. सध्या ‘वडापाव’ चित्रपटाच्या सेटवरचा असाच एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा : “बायकोचं प्रेम”, लंडनहून परतल्यावर सिद्धार्थ चांदेकरला मितालीने दिलं खास गिफ्ट; अभिनेत्याने शेअर केला फोटो

Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Tarak Mehta Fame Mandar Chandwadkar Wife
‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका, म्हणाली…
Bollywood actor varun Dhawan reveals wife of a powerful man broke into his house without permission
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”

‘वडापाव’च्या सेटवर प्रसाद ओकची बायको मंजिरी ओकने सर्वांसाठी खास पोहे बनवले होते. याचा व्हिडीओ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मंजिरी ओक या सेटवर पोहे बनवत असून इतर काहीजण तिला मदत करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. याला रसिकाने “वडापावच्या सेटवर आज पोहे…” असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’नंतर अंकुश चौधरी दिसणार नव्या भूमिकेत, शेअर केली चित्रपटाची पहिली झलक

रसिका शेअर केलेल्या व्हिडीओत प्रसाद ओकला प्रश्न विचारते, “सर, हे पोहे कसे झाले आहेत?” यावर, “अरे सवाल मस्तच… शेवटी केलेत कोणी” असे म्हणत प्रसाद मंजिरीचे कौतुक करतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘वडापाव’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लंडनमध्ये सुरुवात झाली आहे.

चित्रपटाच्या सेटवर पोह्यांचा बेत
चित्रपटाच्या सेटवर पोह्यांचा बेत

हेही वाचा : “भाजपामध्ये प्रवेश करणार का?” अखेर अमोल कोल्हेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

‘वडापाव’ चित्रपटात प्रसाद ओकसह गौरी नलावडे, लक्ष्मीकांतचा बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, सविता प्रभुणे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Story img Loader