Prashant Damle : मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या नाटकावर आधारित सिनेमा नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमात प्रशांत दामले हे हिटलरची भूमिका साकारणार आहेत. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक परेश मोकाशी लिखित आणि दिग्दर्शित होतं. या नाटकाचे शेकडो प्रयोग झाले. या नाटकावर आधारित सिनेमा आता १ जानेवारी २०२५ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे तर मधुगंधा कुलकर्णी यांनी लेखन केलं आहे.

परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘वाळवी’ या तीन मराठी चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांची हॅटट्रिक साधणाऱ्या दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती – लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. २००१ साली रंगभूमीवर आलेले परेश मोकाशी यांचे ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आजही या नाटकाची आठवण काढणाऱ्या प्रेक्षकांना आता तीच कथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”
Navri Mile Hitlarla
पाडवा साजरा करण्यासाठी लीलाने केली युक्ती; टायगरला बोलवताच एजेने…; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी सिनेमाची घोषणा सप्टेंबर महिन्यात

राष्ट्रीय पुरस्कारांची हॅटट्रिक आणि ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे भरघोस यश असा दुहेरी आनंद साजरा करणाऱ्या परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘मु.पो.बोंबिलवाडी- १९४२ एका बॉम्बची बोंब’ या चित्रपटाची घोषणा करून त्याचे पहिलेवहिले पोस्टरही प्रदर्शित केले होते. या सिनेमात हिटलर ही अजरामर भूमिका कोण साकारणार? हा सस्पेन्स आज संपला आहे. अभिनेते प्रशांत दामले ( Prashant Damle ) हे या चित्रपटात हिटलरच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्याच हस्ते या चित्रपटांचं हिटलरचं पोस्टर लाँच करण्यात आलं.

हे पण वाचा- “फक्त भरत जाधव, प्रशांत दामले आहेत म्हणून इंडस्ट्री नाही…”, अभिनेत्याचे स्पष्ट मत

प्रशांत दामलेंनी काय म्हटलं?

“मूळात मी कुठल्याच अँगलने हिटलर दिसत नाही हे मला मान्य आहे. म्हणूनच मला ‘हिटलर’ म्हणून घेतलं आहे. असं प्रशांत दामले ( Prashant Damle ) म्हणाले. प्रशांत दामले ( Prashant Damle ) पुढे म्हणाले, “असा हिटलर तुम्ही इतिहासात बघितला नसेल. या सिनेमात पूर्ण मॅडनेस आहे. या मॅडनेसमध्ये हिटलर कसा बसेल? हा प्रश्न मला पडला होता. पण परेशने ते काम केलं आहे. असा तिरका चित्रपट मी आजवर पाहिलेला नाही. सिनेमा चित्रित करणंही अवघड होतं. शील आणि अश्लील यात एक पातळ सीमारेषा असते. त्या सीमारेषेवर उभं राहून परेशने काम केलं आहे. मी बे दुणे पाच हे नाटक केलं होतं त्यातही अशाच पद्धतीने विनोद निर्मिती केली गेली होती. तसाच हा चित्रपट आहे. हिटलर, चर्चिल असेच असणार आहेत. वेडेपटातून चित्रपट निर्माण होणं हे महत्त्वाचं आहे. ” असं प्रशांत दामले ( Prashant Damle ) म्हणाले.

परेश मोकाशी काय म्हणाले?

मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक लोकांना इतके आवडले की तो माझ्यासाठी एक धक्का होता! बोंबिलवाडीसारख्या छोट्या गावात इंटरनॅशनल घटना घडतात आणि त्यावर दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा निकाल लागतो ही फार्सिकल गोष्ट आजही तितकाच व्यायाम देईल फुप्फुसांना…’ असं सांगत चित्रपटाचं काम सुरू झालं असून लवकरच चित्रपट घेऊन येऊ, अशी आनंदाची भावना परेश मोकाशी यांनी व्यक्त केली.

‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हे नाटक पाहिले तेव्हा आपली हसून हसून पुरेवाट झाली होती आणि त्याचवेळी यावर चित्रपट झाला तर तो किती उत्तम होईल, असा विचार मनात चमकून गेल्याची आठवण मधुगंधा कुलकर्णी यांनी सांगितली. इतर चित्रपटांच्या निमित्ताने प्रेक्षकांची भेट व्हायची तेव्हा त्यांच्याकडूनही हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणण्याची मागणी केली जायची. त्यामुळे या नाटकावर एक चित्रपट नक्की केला पाहिजे. नाटकाच्या काही मर्यादा असतात, त्यामुळे कथा फुलवताना काही गोष्टी दाखवता येत नाहीत. चित्रपटात त्या गोष्टी दाखवून विनोदाची एक वेगळी उंची गाठता येईल असे वाटल्याचेही मधुगंधा यांनी सांगितले. अर्थात परेश यांनी नाटक जसेच्या तसे उचलून चित्रपट न करता त्यावर चित्रपटाचे संस्कार केले आहेत. त्यामुळे हा चित्रपट अत्यंत वेगळा आणि मजेशीर झाला आहे, असे त्यांनी सांगितले.