Vijay Kadam Passed Away : ऐंशी ते नव्वदच्या दशकात मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज पहाटे निधन झालं. अंधेरी येथील निवासस्थानी वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. आज दुपारी विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून विजय कदम ( Vijay Kadam ) कर्करोगाशी झुंज देत होते. त्यावर त्यांनी मात देखील केली होती. पण त्यांना पुन्हा कर्करोग झाला. अंधेरी येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज पहाटे विजय कदम यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. कलाकार मंडळी हळहळ व्यक्त करत आहेत.

kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
Iqbal Chagla passed away, Senior lawyer Iqbal Chagla,
ज्येष्ठ वकील इक्बाल छागला यांचे निधन
लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?
musician-singer Rahul Ghorpade passes away
प्रसिद्ध संगीतकार-गायक राहुल घोरपडे यांचे निधन
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना

हेही वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतून खुशबू तावडेची ‘या’ कारणामुळे अचानक एक्झिट, आता उमाईच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

Actor Vijay Kadam Passes Away,
Vijay Kadam Death : ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन (संग्रहित छायाचित्र)

लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांची जोडी सुपरहिट होती – प्रशांत दामले

अभिनेते प्रशांत दामले ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले, “ही दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे. तसा तो आजारी होता. पण इतक्या लवकरच निधन होईल असं वाटतं नव्हतं. परवापर्यंत आम्ही भेटत होतो, बोलत होतो. पहिल्यांदाच मला अभिनय शिकण्याची संधी त्याच्याकडेच मिळाली. १९८३मध्ये मी पहिल्यांदा ‘टूरटूर’ नाटकात काम केलं होतं. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम ( Vijay Kadam ) यांची जोडी सुपरहिट होती. त्यांना बघत बघत आम्ही शिकत होतो. मी असो विजय चव्हाण असो, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आम्ही लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांना बघून शिकत होतो. विजय कदम खूपच भारी होता. त्याची भाषाशैली उत्तम होती. त्याची रिअ‍ॅक्शनची स्टाइल छान होती. मुळात तो सहाय्यक कलाकारांना खूप पाठिंबा देणारा कलाकार होता. तो फारच लवकर गेला असं मला वाटतं. खरंच खूप दुःखदायक आहे.”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : “मी तर अनाथ मुलगीच बायको करणार”, घरच्यांच्या आठवणीत सुरज चव्हाणने केलं वक्तव्य

पुढे प्रशांत दामले म्हणाले, “आमच्या आठवणी तशा खूप आहेत. पहिला चित्रपट मी त्याच्याबरोबर केला होता आणि कसं होतं, आपण नाटकात ज्या रिअ‍ॅक्शन देतो, तशाच पद्धतीच्या रिअ‍ॅक्शन चित्रपटात द्यायच्या नसतात. ते मला त्याने प्रात्यक्षिक करून सांगितलं होतं. तो माझ्यासमोर बसून सगळं समजून सांगायचा. “

Story img Loader