मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचे व ज्येष्ठ अभिनेते म्हणून प्रशांत दामले यांना ओळखलं जातं. गेली अनेक वर्षे त्यांनी रंगभूमीवर अधिराज्य गाजवलं आहे. ‘जादू तेरी नजर’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. प्रशांत दामले नाट्यसृष्टीत जितके सक्रिय असतात तितकेच सक्रिय ते सोशल मीडियावरदेखील असतात. फेसबुकच्या माध्यमातून ते नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

प्रशांत दामले हे उत्तम अभिनयाप्रमाणेच सुंदर गाणं देखील गातात. त्यांच्या अनेक नाटकांमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या आवाजाची जादू अनुभवायला मिळाली आहे. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये “रिम झिम गिरे सावन…” हे लता मंगेशकर यांचं जुनं गाणं गायलं आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”

हेही वाचा : लग्नात रडला आमिर खानचा जावई, सासूबाईंसह नुपूरचा डान्स, तर विहीणबाईंनी एकमेकींना…; आयरा खानने शेअर केला Unseen व्हिडीओ

प्रशांत दामलेंनी या व्हिडीओला “जरा सुर बघून घेतो” असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने यावर “कायम सुरात असलेल्या कलाकाराला सुर बघून घेण्याची गरज नसते सर!!You are always awesome. संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो तुमच्या अभिनयावर आणि आवाजावर” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा : सासूबाईंचं कौतुक! मृणाल कुलकर्णींना पुरस्कार मिळताच शिवानी रांगोळेची खास पोस्ट, ठरल्या महाराष्ट्राच्या फेवरेट…

prashant
प्रशांत दामले

प्रशांत दामलेंच्या व्हिडीओवर आणखी एका चाहतीने “या वयात सुद्धा आवाज कमाल लागला आहे.” अशी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. याला उत्तर देत अभिनेते म्हणाले, “आताच तर वयात आलोय धन्यवाद!!!” यावर काही युजर्सनी “तुम्ही नेहमीच सदाबहार राहणार सर”, “तुमचं वय झालेलंच नाही” अशा कमेंट्स करत त्यांचं कौतुक केलं आहे. दरम्यान, प्रशांत दामले सध्या ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंज करत आहेत. यामध्ये त्यांच्याबरोबर वर्षा उसगावरकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.