मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारे हरहुन्नरी अभिनेते म्हणून प्रशांत दामले यांना ओळखलं जातं. ‘जादू तेरी नजर’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘साखर खाल्लेला माणूस’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार नाटकांमधून प्रशांत दामलेंनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. रंगभूमीवर काम करताना त्यांनी स्वत:च्या नावावर मोठमोठे रेकॉर्ड्स करून घेतले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रशांत दामलेंनी काही दिवसांपूर्वीच ‘गेला माधव कुणीकडे’ नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं जाहीर केलं होतं. ७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर १८२२ प्रयोग झाले आहेत. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने ‘ब्रेक’ घेतला खरा पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या सेवेत पुन्हा एकदा रुजू झालं आहे. सध्या सोशल मीडियावरद्वारे प्रशांत दामले या नाटकाच्या आगामी प्रयोगाबद्दल माहिती देत असतात. त्यांनी शेअर केलेल्या अशाच एका पोस्टवर एका नेटकऱ्याने खोचक कमेंट केली आहे. या युजरला दामलेंनी सुद्धा स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : Video : “जंतर मंतर बाई गं…”, सहा अभिनेत्री अन् एक हिरो! ‘बाई गं’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

एका युजरने प्रशांत दामलेंच्या फेसबुक पोस्टवर “दामले निवृत्त व्हा” अशी खोचक कमेंट केली आहे. यावर अभिनेत्याने सर्वात आधी “का हो?” असा प्रश्न विचारला. पुढे प्रशांत दामले सविस्तर कमेंट करत म्हणाले, “रसिक प्रेक्षक बोलत नाहीत हे खरं आहे. पण, त्यांच्या मेसेजवरून कळतं की कधी थांबायचं ते…मला अंदाज येतो. सल्ल्याबद्दल धन्यवाद” यावर अभिनेत्याच्या चाहत्यांनी “या कमेंट्सकडे दुर्लक्ष करा”, “विचार नाही करायचा जे चालुये ते असू द्या” अशा प्रतिक्रिया लिहित प्रशांत दामलेंना पाठिंबा दिला आहे.

प्रशांत दामलेंच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचे आता नव्याने केवळ ६३ प्रयोग होणार आहेत. या हरहुन्नरी अभिनेत्याला पुन्हा एकदा ‘माधव’च्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

हेही वाचा : Video : अवघ्या दीड वर्षांच्या राहा कपूरचं प्राणीप्रेम! रणबीरच्या लेकीची ‘ती’ कृती कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

प्रशांत दामलेंच्या पोस्टवरील कमेंट्स

दरम्यान, ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक अशोक सराफ यांना समोर ठेवून लिहिण्यात आलं होतं. मात्र हे नाटक करण्यासाठी त्या काळात अशोक सराफ यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यानंतर हे नाटक प्रशांत दामलेंकडे आलं आणि त्यांनी नाटकातली माधवची भूमिका ज्या प्रकारे केली आहे ती पाहून सगळेच प्रेक्षक आजही आनंदी होतात.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant damle replied to netizens comment who asked him to take retirement sva 00