Prathamesh Parab : ‘टाइमपास’, ‘टाकाटक’, ‘उर्फी’, ‘बालक पालक’ या चित्रपटांमुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरांत लोकप्रिय झाला. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आता मराठीसह हिंदी कलाविश्वात सुद्धा प्रथमेश हळुहळू आपली ओळख निर्माण करत आहे. ‘दृश्यम’ असो किंवा ‘ताजा खबर’ प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रथमेश कायम आपल्या अभिनयाचा ठसा उमटवून जातो.

प्रथमेश वैयक्तिक आयुष्यात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आपले नवीन प्रोजेक्ट, चित्रपट यांची माहिती तो प्रेक्षकांना इन्स्टाग्रामवर देत असतो. नुकतंच प्रथमेशने त्याच्या बायकोसह नवरात्रीच्या निमित्ताने खास फोटोशूट केलं होतं. अशातच अभिनेत्याने शेअर केलेल्या एका भन्नाट डान्स व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

Phullwanti Movie Box Office Collection
प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाचे पाच दिवसांचे कलेक्शन फक्त ‘इतके’, आकडेवारी आली समोर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
rahul gandhi 10 janpath house
“माझ्या वडिलांचं इथेच निधन झालं, त्यामुळे या घराचा…”, राहुल गांधींनी १०, जनपथबाबत केलं विधान!
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Rohit Shetty Singham Again movie Circus of entertainment news
मनोरंजनाची सर्कस
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”

हेही वाचा : “रनर अप होऊन तो ज्या मायेने सूरजशी…”, हास्यजत्रा फेम पृथ्वीकचं अभिजीत सावंतला पत्र! २००४ चा सांगितला किस्सा

गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा पार पडल्यामुळे सर्वत्र सूरज चव्हाणची क्रेझ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सूरज कायम ‘झापुक झुपूक’ डान्स करत असायचा. त्यामुळे हा शो सुरू झाल्यापासून सर्वत्र हे गाणं ट्रेंड होत आहे. या नव्या ट्रेंडची भुरळ आता प्रथमेश परब आणि त्याच्या बायकोला देखील पडली आहे.

Prathamesh Parab
प्रथमेश परब व त्याची पत्नी क्षितीजा घोसाळकर ( Prathamesh Parab )

प्रथमेश आणि क्षितीजाने या व्हिडीओमध्ये पारंपरिक पोशाख केल्याचं पाहायला मिळत आहे. ‘झापुक झुपूक’ या ट्रेंडिंग गाण्यावर या जोडप्याने जबरदस्त डान्स करत सर्वांचं मनं जिंकून घेतलं आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये प्रथमेशने, “आय लव्ह यू ना पिल्लू…सूरज तुला झापुक झुपूक शुभेच्छा” असं लिहिलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांसह सूरज चव्हाणच्या चाहत्यांना अभिनेत्याच्या या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : “रागावू नका…” म्हणत स्पृहा जोशीने केली पोस्ट, आई-वडिलांचा रुग्णालयातील फोटो केला शेअर; नेमकं काय झालं? वाचा

हेही वाचा : Bigg Bossच्या पहिल्याच एपिसोडला ऐतिहासिक TRP! अभिनेत्याची मोठी घोषणा; म्हणाला, “होस्ट म्हणून शेवटचा सीझन…”

Prathamesh Parab
नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Prathamesh Parab )

दरम्यान, प्रथमेश ( Prathamesh Parab ) आणि क्षितीजाच्या या ‘झापुक झुपूक’ डान्सला आतापर्यंत साडेदहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या जोडप्याचा डान्स व्हिडीओ पाहून कलाविश्वातील मंडळींनी देखील त्यांचं कौतुक केलं आहे.

Story img Loader