‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ यांसारख्या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब २४ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकला. क्षितिजा घोसाळकरशी लग्न करून प्रथमेशने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. येत्या २४ एप्रिलला प्रथमेश क्षितिजाच्या लग्नाला दोन महिने पूर्ण होती. पण लग्नानंतर एकाच घरात राहूनही प्रथमेश व क्षितिजाला भेटता येत नाही? असं नेमकं का घडतं? जाणून घ्या…

प्रथमेश व क्षितिजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. प्रथमेश आपल्या आगामी कामासह दैनंदिन जीवनातल्या गोष्टी शेअर करत असतो. क्षितिजा देखील दररोजच्या घडणाऱ्या खास गोष्टी सांगत असते. त्यामुळे लग्न झाल्यापासून प्रथमेश व क्षितिजा कायम चर्चेत असतात. १४ एप्रिलला दोघं डेट आणि डिनरला गेले होते. यासंदर्भातले फोटो शेअर करून क्षितिजाने एकाच घरात राहून एकमेकांना भेटता येत नसल्याचं सांगितलं.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

हेही वाचा – Video: रणवीर सिंहपेक्षा जबरदस्त डान्स करतो ‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली, पाहा व्हिडीओ

१४ एप्रिलला प्रथमेश व क्षितिजाच्या साखरपुड्याला दोन महिने पूर्ण झाल्यानिमित्ताने दोघं डेट आणि डिनरला गेले होते. याचा फोटो शेअर करत क्षितिजाने लिहिलं होतं, “एका घरात राहून सुद्धा, जेव्हा शूट, नाइट शिफ्ट आणि ऑफिस यामुळे कित्येक दिवस एकमेकांना भेटता येत नाही. तरीही वेळ काढून तुमचे स्पेशल डे तुम्ही आवर्जुन साजरे करता.” यादिवशी प्रथमेश व क्षितिजाने ‘मडगांव एक्सप्रेस’ चित्रपट बघितला होता.

हेही वाचा – Video: “चला जाऊ शुटिंगला”, निखिल बनेने भांडूप ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटपर्यंतचा दाखवला प्रवास, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Story img Loader