प्रथमेश परब-क्षितिजा घोसाळकर यांचा साखरपुडा १४ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. अभिनेत्याने या सोहळ्यातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघांनी महिन्याभरापूर्वीच साखरपुड्याच्या तारखेची घोषणा केली होती. आता येत्या २४ फेब्रुवारीला ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथमेशने “आमच्या प्रेमकहाणीचं पुढचं पान सुरू करण्यासाठी आम्ही तयार आहोत” असं कॅप्शन देत साखरपुड्यातील वेस्टर्न लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या जोडप्याने एकमेकांना अंगठी घालताना पारंपरिक लूक केला होता. तर डान्स करताना व केक कापताना दोघांनीही वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : आशुतोष गोवारीकर : ऑस्करवारी करणारा ‘लगान’ ते काळजाला भिडणारा ‘स्वदेस’! भारतीय सिनेमाला इतिहासाची जोड देणारा मराठमोळा दिग्दर्शक

प्रथमेशने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सर्वाधिक लक्ष या दोघांच्या हिऱ्यांच्या अंगठ्यांनी वेधलं आहे. या अंगठीवर आकर्षक डिझाइन करण्यात आली आहे. प्रथमेशच्या इंग्रजी नावानुसार ‘पी’ हे अक्षर, तर क्षितिजाच्या नावातील ‘के’ हे अक्षर या दोन्ही अक्षरांची झलक (KP) त्यांच्या अंगठीमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “आमचा व्हॅलेंटाईन डे…”, थाटामाटात पार पडला प्रथमेश परबचा साखरपुडा; सोशल मीडियावर जुळली रेशीमगाठ

दरम्यान, प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. पुढे हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अभिनेत्याने पहिल्यांदा १४ फेब्रुवारी २०२० रोजी व्हेलेंटाईन डेची फोटोशूट सीरिज पाहून क्षितिजाला मेसेज केला होता. आता येत्या २४ फेब्रुवारीला ही जोडी लग्नंबधनात अडकणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prathamesh parab and kshitija ghosalkar engagement ring photos grabs attention sva 00