‘टाईमपास’ फेम प्रथमेश परब सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्यावर्षी अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर आता प्रथमेश त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघांचा साखरपुडा १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला पार पडणार आहे. प्रथमेश-क्षितिजाने नुकतीच एकत्र राजश्री मराठीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी या दोघांनी त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं.

प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. पुढे हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सुरुवातीच्या दिवसांत क्षितिजाला प्रथमेश मेसेज करतोय की, त्याची पीआर टीम? याबद्दल कल्पना नव्हती. म्हणून तिने अभिनेत्याकडे फोन नंबर मागून घेतला होता. याविषयी सांगताना क्षितिजा म्हणाली, “मला नक्की प्रथमेश मेसेज करतोय ना? याबद्दल अनेक दिवस शंका येत होती. त्यानंतर मी त्याच्याकडून नंबर मागितला आणि आमचं व्हॉट्सअपवर बोलणं सुरू झालं. तरीही खरंच प्रथमेश आपल्याशी बोलतोय का? याबद्दल मला खात्री वाटत नव्हती. त्यामुळे एकदा त्याने मला व्हिडीओ कॉल केला. परंतु, मी कामात असल्याने त्याचा फोन उचलू शकले नाही.”

prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

हेही वाचा : “ती एकमेव…”, सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकरची ‘अशी’ आहे ऑफस्क्रीन मैत्री; अभिनेता म्हणाला, “३ किंवा ६ महिन्यांनी…”

क्षितिजा पुढे म्हणाली, “त्यानंतर आम्ही एकदा व्हिडीओ कॉलवर बोललो. लॉकडाऊन संपल्यावर हळुहळू सगळ्या गोष्टी सुरू होत होत्या. तेव्हा आम्ही पहिल्यांदा एका मॉलमध्ये भेटलो. पुढे, १४ फेब्रुवारी २०२१ ला आम्ही रिलेशनशिपमध्ये येण्याचा विचार केला.”

हेही वाचा : …अन् क्रांती रेडकरच्या लेकीला कोसळलं रडू! अभिनेत्रीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, नेमकं काय घडलं?

लव्हस्टोरीबद्दल सांगताना प्रथमेश म्हणाला, “एकदा कॅफेमध्ये तिने मला रिलेशनशिप ठेवायचं का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर मी तिला “हो मला काहीच अडचण नाही आपण एकत्र राहूया” असं सांगितलं. त्यावेळी ती समोरून मला म्हटली, ‘अरे मग तू ते म्हणत का नाहीस?’ काय असं विचारल्यावर ती स्वत:हून ‘अरे…आय लव्ह यू’ म्हटली. मग मी क्षितिजाला ‘आय लव्ह यू टू’ म्हटलं. असं तिच्याकडून मी ‘आय लव्ह यू’ वदवून घेतलंय. अशाप्रकारे आमच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली.”

Story img Loader