प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांनी फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधत एका नव्या आयुष्याला सुरुवात केली. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. जानेवारी महिन्यात केळवणाचा फोटो शेअर करत प्रथमेशने त्याच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. अभिनेत्याने १४ फेब्रुवारीला म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी थाटामाटात साखरपुडा केला. यानंतर बरोबर १० दिवसांनी म्हणजेच २४ फेब्रुवारीला प्रथमेश-क्षितीजाचं लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडलं. या दोघांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील बरील कलाकारमंडळी उपस्थित होती.

प्रथमेश-क्षितीजा इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असतात. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘टाईमपास’, ‘टकाटक’, ‘बालक पालक’, ‘डिलिव्हरी बॉय’ अशा चित्रपटांमधून अभिनेता प्रथमेश परब घराघरांत लोकप्रिय झाला होता. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्याला खऱ्या आयुष्यातली ‘प्राजू’ भेटल्यामुळे त्याचे सर्वच चाहते सध्या आनंदी आहेत. नुकतीच प्रथमेश आणि क्षितीजाने मिळून त्यांची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी आपल्या बायकोच्या जोडीने अभिनेत्याने देखील उपवास पकडला होता.

Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
nana patekar talks about wife neelkanti patekar
“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…
genelia deshmukh celebrate vat purnima
Video : “माझे प्रिय नवरोबा”, देशमुखांच्या सुनेची वटपौर्णिमा! जिनिलीया म्हणते, “रितेश तुम्हाला माझं आयुष्य…”
Aishwarya and Avinash Narkar son amey girlfriend play role in zee marathi lakhat ek amcha dada serial
ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार
Viral Video: Girl's Rain Dance Interrupted By Thunderbolt Scare shocking video
VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?
ashok and nivedita saraf evergreen love story
वयात १८ वर्षांचं अंतर, लग्नाला विरोध ते सहजीवनाची ३५ वर्षे! अशोक व निवेदिता सराफ यांची सदाबहार प्रेमकहाणी

हेही वाचा : लेक-जावयासह फोटोशूट, लग्नात केली पूजा अन्…; शत्रुघ्न सिन्हांनी शेअर केले Unseen व्हिडीओ, सोनाक्षीला अश्रू अनावर

वटपौर्णिमा सणासाठी प्रथमेश आणि क्षितीजा दोघंही कोकणात गेले होते. दोघेही जोडीने कोकणातील श्रीवर्धन येथे पोहोचले आहेत. याठिकाणी क्षितिजाचं गाव आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच गावी गेलेल्या जावयाचं घोसाळकरांनी जोरदार स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय प्रथमेशने देखील क्षितीजाच्या गावी छान असा वेळ घालवला. याचा खास व्हिडीओ या दोघांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

कोकणातील सुंदर मंदिरं, हरिहरेश्वर समुद्रकिनारा, सासरवाडीत उकडीचे मोदक, गावचा पाऊस, गरमागरम चहा, भर पावसात कोकणातील रस्त्यावर जोडीने बाईक राइडचा आनंद या सगळ्या गोष्टी क्षितीजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तिने या व्हिडीओला “श्रीवर्धन स्टोरीज #प्रतिजा…” असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी या दोघांच्या सुंदर व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’ची नवीन मालिका ‘या’ दिवशी होणार सुरु, ‘लाखात एक आमचा दादा’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित

दरम्यान, प्रथमेश आणि क्षितिजा गेली ३ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सोशल मीडियावर त्यांची पहिली ओळख आणि त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली होती. पुढे, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन प्रथमेश-क्षितीजाने आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आणि २४ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली.