‘टाइमपास’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब २४ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकला. क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधून प्रथमेशने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेता बायकोबरोबर लोणावळ्याला फिरायला गेला होता. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता लग्नानंतरचा बायकोचा पहिला वाढदिवस प्रथमेशने कसा साजरा केला? पाहा.
“हॅप बर्थडे बायको…बायको म्हणताना खूपच वेगळं वाटतं…आपलं वाटतं, तुझं असणं, हसणं, रडणं, रुसण, समजून घेणं, समजावणं, सतत हसत राहणं, लोकांना ही हसवत ठेवणं सगळचं खूप भारी आहे…थँक्यू सगळ्या गोष्टींसाठी, आय लव्ह यू,” असं लिहित अभिनेता प्रथमेश परबने क्षितिजाच्या वाढदिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा – Video: आता खऱ्या अर्थाने ‘प्रेमाची गोष्ट’ होणार सुरू, सागर मुक्ताला करणार प्रपोज!
या व्हिडीओत, अभिनेता आपल्या कुटुंबासह क्षितिजाचा वाढदिवस साजरा करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्याची आई सूनेचं औक्षण करताना दिसत आहे. त्यानंतर क्षितिजा केक कापून परब कुटुंबाबरोबर वाढदिवस साजरा करताना पाहायला मिळत आहे. यावेळी प्रथमेशने बायकोला लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने खास भेटवस्तूला दिल्या. चॉकलेट्स, नेकलेस, अंगठी, ब्रेसलेट असं बरंच काही प्रथमेशने क्षितिजाला दिलं.
प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यामुळे आता दोघांनी संसार थाटायचा निर्णय घेतला.
क्षितिजा घोसाळकर कोण आहे?
प्रथमेशची बायको क्षितिजा फॅशन मॉडेल आहे. तसेच ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. क्षितिजाला लिखाणाची खूप आवड आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. क्षितिजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची बायको झळकली होती.