Prathamesh Parab : प्रथमेश परब यावर्षी २४ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकला. आज अभिनेत्याच्या लग्नाला ८ महिने पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने प्रथमेशने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेश व त्याची पत्नी क्षितीजा दादा कोंडकेंच्या सुपरहिट मराठी गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे.

“काय ग सखू बोला दाजिबा…” हे दादा कोंडके यांच्या सोंगाड्या चित्रपटातील सदाबहार गीत आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहे. अनेक वर्षे उलटली तरी आजही या गाण्याची लोकप्रियता सगळ्याच रसिक प्रेक्षकांच्या मनात कायम टिकून आहे. या मराठमोळ्या गाण्यावर व्हिडीओ बनवताना प्रथमेशने काहीसा मॉडर्न टच दिला आहे. भर पावसात रानात व्हिडीओ शूट करताना प्रथमेश व त्याच्या पत्नीने धोतर, नऊवारी साडी असा नेहमीसारखा पारंपरिक पोशाख न करता मॉडर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रथमेशचा हा मराठमोळ्या गाण्यावरचा वेस्टर्न अंदाज नेटकऱ्यांच्या देखील पसंतीस उतरला आहे. त्यामुळे नेटकरी या व्हिडीओवर “मॉडर्न सखू विथ मॉडर्न दगडू”, “खूपच सुंदर” अशा प्रतिक्रिया देत आहेत.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..

हेही वाचा : “अविच्या नावावरचं पहिलं घर…”, ऐश्वर्या नारकरांनी दाखवली नव्या फ्लॅटची झलक, पतीसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाल्या…

प्रथमेश परबचा मराठमोळ्या गाण्यावर मॉडर्न अंदाज

प्रथमेश व त्याच्या पत्नीचे कमाल एक्स्प्रेशन्स या गाण्यात लक्ष वेधून घेतात. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्याने पत्नी क्षितीजा घोसाळकरसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Prathamesh Parab
प्रथमेश परब व क्षितीजा घोसाळकर ( Prathamesh Parab )

प्रथमेश ( Prathamesh Parab ) लिहितो, “लग्नाला ८ महिने पूर्ण झाले… हा आनंदाचा दिवस मी माझ्या सखूबरोबर खूप प्रेमाने आणि आनंदाने साजरा करत आहे. हा व्हिडीओ आम्ही आमच्या लग्नाला ५ महिने पूर्ण झाले होते तेव्हा शूट केला होता. पण, आजही हा व्हिडीओ तेवढाच फ्रेश आहे म्हणून शेअर करतोय…मी आणि माझी सखू”

हेही वाचा : “ट्रक उलटून माझा मृत्यू झाला तर…”, घोडबंदर मार्गाने प्रवास करणारा अभिनेता संतापला; म्हणाला, “घाणेरड्या रस्त्यांमुळे…”

दरम्यान, प्रथमेश परब ( Prathamesh Parab ) व क्षितिजा घोसाळकर यांचा लग्नसोहळा फेब्रुवारी महिन्याच्या २४ तारखेला थाटामाटात पार पडला होता. जानेवारी महिन्यात एकत्र केळवणाचा फोटो शेअर करत या जोडप्याने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. दोघांच्या लग्नाला सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

Story img Loader