Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Engagement: महाराष्ट्राचा लाडका दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह सात फेरे घेऊन आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. नुकताच १४ फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डेदिवशी प्रथमेश व क्षितिजाचा साखरपुडा पार पडला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरच्या साखरपुड्यातील एका व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेश होणाऱ्या बायकोसाठी झोपून डान्स करताना दिसत आहे. हा डान्स व्हिडीओ अभिनेत्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – “हा दुग्ध शर्करा योगच…”, प्रथमेश लघाटने सांगितला लग्नानंतर पहिल्यांदाच घडलेला ‘हा’ आनंदाचा क्षण, म्हणाला…

“खऱ्या आयुष्यात थोडं फिल्मी होणं गरजेचं आहे,” असं कॅप्शन लिहित प्रथमेशने साखरपुड्यातील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेश शाहरुख खान व काजोलच्या ‘दिलवाले’ चित्रपटातील ‘गेरुआ’ या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. प्रथमेशच्या या डान्स व्हिडीओवर होणाऱ्या बायकोने छान कमेंट केली आहे. “तुझ्या प्रेमात वेडेपणा”, अशी कमेंट क्षितिजाने कमेंट केली आहे.

हेही वाचा – सोशल मीडियावर पहिली ओळख अन्…; ‘अशी’ आहे प्रथमेश परब-क्षितिजाची अनोखी लव्हस्टोरी

क्षितिजा घोसाळकर कोण आहे?

प्रथमेशची होणारी बायको क्षितिजा फॅशन मॉडेल आहे. तसेच ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. क्षितिजाला लिखाणाची खूप आवड आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. क्षितिजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची होणारी बायको झळकली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prathamesh parab dance on shahrukh khan gerua song in engagement ceremony video viral pps