Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Engagement : ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा चालू आहे. जानेवारी महिन्यात केळवणाचे फोटो शेअर करत अभिनेत्याने साखरपुडा व कालांतराने लग्नाची तारीख जाहीर केली होती. यानंतर अभिनेत्याच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळालं. ठरल्याप्रमाणे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रथमेश परब व त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर यांनी एक नवी सुरुवात केली आहे. या दोघांचा साखरपुडा आज ( १४ फेब्रुवारी ) थाटामाटात पार पडला असून या सोहळ्यातील काही खास फोटो अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

“आमचा व्हॅलेंटाईन डे असा साजरा झाला…इथून पुढे आयुष्यभराची साथ राहील” असं कॅप्शन देत प्रथमेशने साखरपपुड्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी, तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची सुंदर अशी पैठणी साडी नेसली होती.

हेही वाचा : लोकप्रिय अभिनेत्रीला रवींद्र महाजनींशी करायचं होतं लग्न, त्यांच्या पत्नी खुलासा करत म्हणाल्या, “तिने गाडीतून उडी मारली अन्…”

प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. पुढे हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अभिनेत्याने पहिल्यांदा १४ फेब्रुवारी २०२० रोजी व्हेलेंटाईन डेची फोटोशूट सीरिज पाहून क्षितिजाला मेसेज केला होता. पुढे, बरोबर एक वर्षाने म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी रिलेशनशिपला सुरुवात केली. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रथमेश-क्षितिजाने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.

हेही वाचा : ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचे दिग्दर्शक आहेत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे पती, ‘ठरलं तर मग’ मलिकेचंही केलं होतं दिग्दर्शन

१४ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या रिलेशनशिपला ३ वर्षे पूर्ण होणार असल्याने या खास दिवशी साखरपुडा करण्याचा निर्णय प्रथमेशने जानेवारी महिन्यात घेतला होता. दरम्यान, सध्या मराठी कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.