अभिनेता प्रथमेश परब सध्या कामाव्यतिरिक्त वैवाहिक जीवन एन्जॉय करताना दिसत आहे. २४ फेब्रुवारीला प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरबरोबर लग्न केलं. मोठ्या थाटामाटात, धुमधडाक्यात प्रथमेश व क्षितिजाचा लग्नसोहळा झाला होता. दिग्दर्शक रवी जाधव, सिद्धार्थ जाधव, ‘टाइमपास’ चित्रपटातील कलाकार अशा अनेकांनी प्रथमेश व क्षितिजाचा लग्नाला हजेरी लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्न झाल्यापासून प्रथमेश व क्षितिजा कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर दोघं लग्नानंतरच्या खास क्षणाचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकताच क्षितिजाने सासूबाई म्हणजेच प्रथमेशच्या आईने तिच्यासाठी केलेल्या खास पदार्थाचा फोटो शेअर केला होता.

हेही वाचा – Video: …यामुळे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर भडकला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “देऊ का एक थोबाडीत?”

क्षितिजाने इन्स्टाग्राम स्टोरीवर सासूबाईंनी बनवलेल्या पाणीपुरीचा फोटो शेअर केला होता. या फोटोवर तिने लिहिलं होतं, “जेव्हा तुम्ही खूप थकून ऑफिसमधून येता आणि आल्या आल्या तुमच्यासाठी तुमच्या आवडीची पाणीपुरी बनवलेली असते. #सासूबाईंच्या हातचं.”

प्रथमेशची बायको कोण आहे?

प्रथमेशची बायको क्षितिजा फॅशन मॉडेल आहे. तसेच ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. क्षितिजाला लिखाणाची खूप आवड आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. क्षितिजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची बायको झळकली होती.

हेही वाचा – “पुरस्कार द्यायला पाहिजे होता,” शरद पोंक्षेंच्या ‘नथुराम गोडसे’ नाटकाबद्दल संजय मोनेंचं स्पष्ट मत; म्हणाले, “कुठल्या परीक्षकाला प्रतिगामी…”

दरम्यान, प्रथमेश आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘ताजा खबर’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा टीझर आला होता. या टीझरमध्ये प्रथमेश झळकला होता. ‘ताजा खबर सीझन २’ मध्ये प्रथमेश व्यतिरिक्त भुवन बाम, श्रिया पिळगांवकर, महेश मांजरेकर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prathamesh parab mother made panipuri for her daughter in law kshitija ghosalkar pps