Prathamesh Parab : सध्या देशभरात अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाची क्रेझ निर्माण झालेली आहे. एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे, मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीयेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मराठी चित्रपटांना थिएटर्स किंवा स्क्रिन्स न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यांपासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा ‘श्री गणेशा’ हा चित्रपट २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेंडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर्स उपलब्ध नाहीत अशी खंत अभिनेत्याने ( Prathamesh Parab ) इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Allu Arjun : अल्लू अर्जुन अटक प्रकरणात न्यायालयाचं निरीक्षण “सेलिब्रिटींचे हक्कही सामान्य माणसांप्रमाणेच असतात, एखादी घटना..”

अभिनेता प्रथमेश परबची पोस्ट

श्री गणेशा

एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेते, त्याच्या स्क्रिप्टवर, व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडू लागतं. अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो. आपली व्यक्तिरेखा, त्यातलं वेगळेपण… या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकाराला वाटतं.

चित्रपट प्रदर्शित होतो,
प्रेक्षकांना तो फार आवडतो…
थिएटर व्हिजिट केल्यानंतर, त्यांच्या प्रत्यक्ष प्रतिक्रिया…त्यांच्या डोळ्यातील अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेला संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं.

आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय…..
पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटर्सच नाहीत.

अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषिक सिनेमाला, महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत. यापेक्षा दुर्दैवी दुसरं काय असू शकतं. ( Prathamesh Parab )

हेही वाचा : Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

हेही वाचा : “मी मालिका करणार नव्हतो, पण…”, अशोक सराफ यांनी सांगितलं टेलिव्हिजनवर कमबॅक करण्याचं कारण; म्हणाले, “निवेदिता…”

प्रथमेश परबच्या ( Prathamesh Parab ) पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागले आहेत. याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुकताच थिएटर्स उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता. आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘टाईमपास’ चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरांत लोकप्रिय झाला. यामध्ये त्याने साकारलेली ‘दगडू’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘टकाटक’, ‘उर्फी’, ‘बालक पालक’ अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये प्रथमेशने परबने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने मराठीसह बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prathamesh parab regret for not getting enough screens for marathi movies sva 00