प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा लग्नसोहळा २४ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. ‘प्रतिजा’च्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती.

थाटामाटात लग्न झाल्यावर आता प्रथमेश परब लाडक्या बायकोबरोबर देवदर्शनासाठी निघाला आहे. या दोघांनी लग्नानंतर परंपरेनुसार सोमवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी जोडीने मुंबादेवीच्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. याचा खास फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रथमेश व क्षितिजाने लग्नानंतर पहिल्यांदाच जोडीने देवाचं दर्शन घेताना खास पारंपरिक लूक केला होता. अभिनेत्याने फिकट गुलाबी रंगाचा सदरा, तर क्षितिजाने लाल रंगाची साडी नेसली होती. नाकात नथ, भरजरी दागिने, हातात हिरवा चुडा असा पारंपरिक लूक करून क्षितिजा मंदिरात गेली होती. मंदिर परिसरातील खास फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : तितीक्षा तावडेच्या लग्नासाठी निघाल्या ऑनस्क्रीन सासूबाई, ऐश्वर्या नारकरांच्या ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष

prathmesh parab
प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर

हेही वाचा : मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस परब! लग्नानंतर प्रथमेश-क्षितिजामध्ये रंगला अंगठी शोधण्याचा अनोखा खेळ; फोटो व्हायरल

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून प्रथमेश आणि क्षितिजावर मनोरंजन क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. प्रथमेशच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेता शेवटचा ‘डिलीव्हरी बॉय’ चित्रपटात झळकला होता. भविष्यात त्याला आणखी वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader