‘टाइमपास’ चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरांत लोकप्रिय झाला. आजवर त्याने ‘डिलिव्हरी बॉय’, ‘उर्फी’, ‘टकाटक’, ‘बालक पालक’, ‘३५ टक्के काठावर पास’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मनोरंजन विश्वात यश मिळाल्यावर प्रथमेशने वैयक्तिक आयुष्यात एक नवीन इनिंग सुरु केली. त्याने २४ फेब्रुवारीला क्षितीजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथमेश व क्षितीजा गेली ३ वर्षे एकमेकांना डेट करत होते. यावर्षीच्या जानेवारी महिन्यात केळवणाचा फोटो शेअर करत अभिनेत्याने लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचं त्याच्या चाहत्यांना सांगितलं होतं. अखेर १४ फेब्रुवारी २०२४ म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला प्रथमेशने साखरपुडा केला आणि त्यानंतर बरोबर १० दिवसांनी २४ फेब्रुवारीला प्रथमेश-क्षितीजा लग्नबंधनात अडकले. विवाहसोहळा पार पडल्यावर अभिनेता लगेच त्याच्या शूटिंगमध्ये व्यग्र झाला होता. आता जवळपास लग्नाला ५ महिने पूर्ण झाल्यावर प्रथमेश-क्षितीजा वटपौर्णिमेच्या निमित्ताने कोकणात गेले होते. श्रीवर्धनला प्रथमेशची सासुरवाडी आहे.

हेही वाचा : “एसी ट्रेन वेळेत नसतात, पैसे वाया जातात अन्…”, मुंबई लोकलबद्दल मराठी अभिनेत्रीची सविस्तर पोस्ट, अनुभव सांगत म्हणाली…

प्रथमेश व क्षितीजाने कोकणात एकत्र वेळ घालवला, दोघंही बाईक राइड करत समुद्रकिनारी फिरले याचे काही फोटो अभिनेत्याच्या बायकोने इन्स्टाग्रामवर शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे.

क्षितीजा लिहिते, “लग्नानंतर जवळपास पाच महिन्यांनी मी आणि माझा नवरा आम्ही दोघं श्रीवर्धनला गेलो. याठिकाणी माझ्या आई-बाबांचं घर आहे. लग्नानंतर माहेरी जाणं हा क्षण माझ्यासाठी कमालीचा भावनिक होता. कारण, जवळपास ५ महिन्यांनी गावी परतण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. अनेक आठवणी ताज्या झाल्या. माझ्या घराचा प्रत्येक कोपरा बालपणीच्या आठवणी सांगत होता. घराच्या त्याच दरवाजातून चालत आत आले, खोल्यांमध्ये बसले पण फरक एवढाच की, आता माझा जोडीदार माझ्याबरोबर होता. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांचा सुंदर मिलाफ यानिमित्ताने झाला.”

हेही वाचा : दागिने, किराणा सामान अन् ‘इतक्या’ लाखांचा चेक…; अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाह सोहळ्यात ५० गरीब जोडप्यांना काय-काय दिलं? जाणून घ्या…

“श्रीवर्धनमधील ऊर्जा, त्या जागेचं सौंदर्य या सगळ्या गोष्टी पाहून आपण मोहून जातो. आम्ही प्रत्येक क्षण आमच्या आठवणीत साठवला आहे. समुद्रकिनाऱ्यांवर वाहणाऱ्या वाऱ्यांपासून ते श्रीवर्धनच्या स्थानिक संस्कृतीपर्यंत सगळं काही आम्ही एकत्र अनुभवलं. श्रीवर्धन हे ठिकाण आता आम्हा दोघांसाठी खूप जवळचं आणि आपुलकीचं आहे.” असं क्षितीजाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, अभिनेत्याच्या पत्नीने या पोस्टसह त्यांच्या श्रीवर्धन ट्रिपचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये प्रथमेश परबच्या सासुरवाडीतल्या संपूर्ण कुटुंबाची झलक पाहायला मिळत आहे. दरम्यान, नेटकऱ्यांनी “क्यूट कपल”, “बेस्ट कपल” अशा कमेंट्स करत या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prathamesh parab visit wife kshitija village shrivardhan in konkan sva 00