‘टाईमपास’ चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरांत लोकप्रिय झाला. गेल्या महिन्यात २४ फेब्रुवारीला त्याने क्षितिजा घोसाळकरसह लग्नगाठ बांधली. या जोडप्याच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना खास उपस्थिती लावली होती. आज त्यांच्या लग्नसोहळ्याला बरोबर १ महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्ताने अभिनेत्याच्या पत्नीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

प्रथमेश आणि क्षितिजा गेली ३ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या जानेवारी महिन्यात केळवणाचा फोटो शेअर करत त्यांनी लग्नाची तारीख जाहीर केली होती. यानंतर गेल्या महिन्यात १४ फेब्रुवारीला साखरपुडा आणि २४ फेब्रुवारीला प्रथमेश-क्षितिजाचं लग्न थाटामाटात पार पडलं.

हेही वाचा : “मुंबईत सुरुवातीला आलो तेव्हा…”, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने केला लोकलने प्रवास, सांगितला खास अनुभव

प्रथमेशची पत्नी क्षितिजाने लग्नाला १ महिना पूर्ण झाल्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. “एक महिन्यापूर्वी मला माझ्या आयुष्याचा जोडीदार सापडला. एवढ्या कमी वेळात आपण आपल्या आयुष्यातील सुंदर काळ अनुभवला आहे. असे सुखाचे क्षण भविष्यात येत राहणार…” अशी पोस्ट अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हेही वाचा : Video: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नेत्रा व रुपालीने दिल्या अनोख्या अंदाजात होळीच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

दरम्यान, प्रथमेश-क्षितिजाने शेअर केलेल्या पोस्टवर अवघ्या काही मिनिटांतच नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर शेवटचा तो ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटात झळकला होता.

Story img Loader