प्रथमेश परबने २४ फेब्रुवारी २०२४ रोजी क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली. दोघांच्याही लग्नाला सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. थाटामाटात लग्न पार पडल्यावर क्षितिजाचं अभिनेत्याच्या घरी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी तिने प्रथमेश परबसाठी भन्नाट उखाणा घेत सर्वांचं मन जिंकलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्षितिजाने प्रथमेशसाठी घेतलेला खास उखाणा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘बालक-पालक’ (बीपी), ‘टाइमपास’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘डिलिव्हरी बॉय’ या सगळ्या चित्रपटांचा क्षितिजाने तिच्या उखाण्यात उल्लेख केला आहे.

हेही वाचा :पंचायत २’ फेम अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू, चार भोजपुरी कलाकारांसह ९ जणांनी गमावला जीव

क्षितिजा म्हणते, “हृदयी वसंत फुलताना वाढला होता थोडासा ‘बीपी’, डॉक्टर बोलावले तेव्हा कुठे स्थिर झाला आयुष्याचा ‘डीपी’, प्रेम आमचं खरंय… नाही थिल्लर ‘टाइमपास’, प्रेमाच्या परीक्षेत दोघांनीही मिळवले शंभर टक्के आणि नाही झालं कोणी ३५ टक्के काठावर पास…जोडी आमची ‘टकाटाक’… आहे एक नंबर! खिचिक खिचिक करत लोकही फोटो काढतात शंभर. ढिश्कियाऊं धूमधडाक्यात पार पडला होता साखरपुडा… मेहंदीच्या दिवशी ‘डिलिव्हरी बॉय’ने आणून दिला सौभाग्याचा चुडा. लग्न झालं थाटामाटात झालो आम्ही ‘उर्फी’. आयुष्यभर एकमेकांना भरवू आनंदाने बर्फी.”

“प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब. आता माझीही नव्याने ओळख करून देते मी सौ. क्षितिजा प्रथमेश परब.” असा भन्नाट उखाणा क्षितिजाने लाडक्या नवऱ्यासाठी घेतला आहे.

हेही वाचा : “पुढील महाराष्ट्र भूषण”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाचा सुरेश वाडकरांना टोला; म्हणाले, “तुजं नमो गायक…”

दरम्यान, प्रथमेशची बायको क्षितिजा ही बायोटेक्नॉलिजिस्ट आहे. तिला लिखाणाची खूप आवड असून खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. क्षितिजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची बायको झळकली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prathamesh parab wife kshitija ghosalkar special ukhana for husband mentioned all names of his movies sva 00