‘टाइमपास’ या चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटामध्ये त्याने साकारलेला दगडू आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर प्रथमेशने एकापेक्षा एक विनोदी तसेच बोल्ड मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. आता त्याचा ‘ढिशक्याव’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अशामध्येच आता प्रथमेश त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. प्रथमेशने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे प्रेमाची कबुली दिली आहे.
आणखी वाचा – वहिनीच्या ‘त्या’ एका निर्णयानंतर रितेश देशमुखही भारावला, पोस्ट शेअर करत म्हणाला, “हे तर…”
२०२२मध्ये दिवाळीनिमित्त प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरबरोबर खास फोटोशूट केलं होतं. यानंतर प्रथमेश व क्षितिजाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र प्रथमेशने याबाबत बोलणं टाळलं. आता व्हॅलेंटाईन डेनिमित्त त्याने आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. प्रथमेशने गर्लफ्रेंड क्षितिजाबरोबरचा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये प्रथमेश तिच्याकडे बघत आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने म्हटलं की, “ती म्हणते हे करू मी म्हणतो ओके. आणि हे असंच सुरू राहू दे”. तसेच आता हे अधिकृत नातं आहे असंही हॅशटॅग प्रथमेशने त्याच्या या पोस्टला दिलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रथमेश व क्षितिजा एकमेकांना डेट करत आहेत.
आणखी वाचा – गर्लफ्रेंडचा छळ, मारहाण, गाण्यांमध्येही शिवीगाळ अन्…; पुण्यात राहणाऱ्या एमसी स्टॅनचं आधी कसं होतं आयुष्य?
क्षितिजानेही प्रथमेशबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या दोघांचे दोन वर्षांपासून एकत्र असल्याचे फोटो दिसत आहे. व्हॅलेंटाईन डेनिमित्तच प्रथमेशने क्षितिजाला प्रपोज केलं होतं. आता आयुष्यभर ही जोडी अशीच राहणार असं क्षितिजाने म्हटलं आहे. शिवाय प्रथमेशने पोस्ट शेअर करताच मराठी कलाकारांसह चाहतेही त्याचं अभिनंदन करत आहेत.