पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रवीण तरडे, स्मिता गोंदकर, अमोल कांगणे यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या.
या चित्रपटात अभिनेता प्रवीण तरडे, अभिनेत्री स्मिता गोंदकर हे प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि किर्ती वराडकर प्रस्तुत ‘बलोच’ चित्रपटात प्रवीण तरडे, अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
पानिपतची लढाई आणि पराभव ही मराठेशाहीसाठी जरी काळा दिवस असला तरी मराठी ही मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे. ‘बलोच’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही विजयगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.