पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा रोमांचक टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. या टिझरमध्ये चित्रपटाची भव्यता पाहायला मिळत आहे.
या टिझरची सुरुवात एका दमदार डायलॉगने होते. “पानिपत ही मराठ्यांची शेवटची लढाई नव्हती, बलोचमध्येही एक लढाई अशी लढली गेली, जिथे मराठे हरुन नाही तर कोणाला तरी मारुन परत आले होते”, असा दमदार डायलॉग पाहायला मिळत आहे. यावेळी लढाईची काही दृश्यही पाहायला मिळत आहे. हा टिझर पाहिल्यावर अंगावर शहारे येतात.
आणखी वाचा : सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा मोठ्या पडद्यावर अवतरणार, प्रवीण तरडेंच्या बहुचर्चित ‘बलोच’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
प्रवीण तरडे यांचे मनाला भिडणारे संवाद, मराठ्यांचे साम्राज्य टिकवण्यासाठीची तगमग दिसतेय. पानिपतचा पराभव मराठ्यांसाठी महाप्रलयच ठरला. या पराभवानंतर बलुचिस्तानात मराठ्यांना गुलामगिरी पत्करावी लागली. पानिपतची लढाई आणि पराभव ही मराठेशाहीसाठी जरी काळा दिवस असला तरी मराठी ही मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे. ‘बलोच’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही विजयगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा : “आम्हा दोघांना…” अक्षया देवधरबरोबर झालेल्या साखरपुड्याच्या अफवांवर सुयश टिळकची पहिली प्रतिक्रिया
मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या ‘बलोच’ चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि किर्ती वराडकर प्रस्तुत ‘बलोच’ चित्रपटात प्रवीण तरडे, अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.