प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. या महाकुंभमेळ्यात देशभरातील भाविक हजेरी लावताना दिसतात. भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी या महाकुंभ मेळ्याला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. त्यामध्ये ममता कुलकर्णी, अनुपम खेर, गायक गुरू रंधावा, शंकर महादेवन, रेमो डिसूझा यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. आता प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे(Pravin Tarde) व त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे(Snehal Tarde) यांनीदेखील महाकुंभ मेळ्यात हजेरी लावत त्रिवेणी संगमामध्ये स्नान केले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवीण तरडे-स्नेहल तरडे यांची कुंभमेळ्याला हजेरी

स्नेहल तरडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासह प्रवीण तरडे दिसत आहेत. दोघांनीही भगव्या रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत. दोघांनी त्रिवेणी संगमामध्ये स्नान केले आहे. पुढे त्यांनी पूजा केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी बोटीतून प्रवास केल्याचे या व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना “अनुभव, त्रिवेणी संगम स्नान, २९ जानेवारी २०२५, मौनी अमावास्या, महाकुंभ २०२५, प्रयागराज, उत्तर प्रदेश”, असे लिहिले आहे. हा व्हिडीओ शेअऱ करताना त्यांनी प्रवीण तरडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे.

स्नेहल तरडे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत दोघांचेही कौतुक केले आहे. “हंबीरराव आणि लक्ष्मीबाई” “कलियुगातील सीता आणि राम. एक क्षण वाटलं सीतामाता अशाच असतील.” “लक्ष्मीनारायणाचा जोडा”, “माझे सीतामाई आणि प्रभू राम”, असे लिहीत हार्ट इमोजी शेअर केली आहे. “साक्षात परमेश्वर, माझे शंकर-पार्वती”, “ताई तू रामायणातल्या सीतामाईसारखी दिसत आहेस”, “राम आणि सीता माता”, “मॅडम, तुम्ही सीतामाता झाला आहात”, “तुम्ही दोघे राम-सीतेसारखे दिसत आहात, जय श्रीराम”, अशा कमेंट्स करीत चाहत्यांनी त्या दोघांचेही कौतुक केले आहे.

दरम्यान, महाकुंभमेळ्यामुळे अनेक कलाकारांची मोठी चर्चा होताना दिसत आहे. बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने या महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच तिला देण्यात आलेल्या किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर या पदावरून वादही निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin tarde and snehal tarde at mahakumbh mela shares video netizens praised nsp