मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम दिग्दर्शक आणि अभिनेता अशी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे प्रवीण तरडे हे आहे. ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’, ‘बलोच’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘पांडू’, ‘देऊळ बंद’ अशा अनेक चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनयात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता प्रवीण तरडे ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटातील त्यांचे सहकलाकार देव गिल यांनी एका मुलाखतीदरम्यान प्रवीण तरडेंना लोकांनी चाकोरीबाहेर काम करू दिलं नाही, असे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाला अभिनेता?

‘अल्ट्रा बझ मराठी’ या युट्यूब चॅनेलला प्रवीण तरडे आणि देव गील यांनी नुकतीच मुलाखत दिली. यावेळी प्रवीण तरडे यांच्याविषयी बोलताना अभिनेता देव गीलने म्हटले, “प्रवीण सरांना लोकांनी डब्ब्यात बंद करून ठेवले होते, स्वातंत्र्य दिले नव्हते. म्हणजेच एक चौकट आखून दिली होती आणि त्याच चौकटीत चित्रपट बनवायला सांगितले होते. आता हंबीररावसारख्या चित्रपटाची उंची खूप मोठी आहे. तो चित्रपट बनवण्यासाठी तुम्हाला १०० कोटीचे बजेटच लागेल. जर त्यापेक्षा कमी बजेटमध्ये असा चित्रपट बनवायला सांगितले तर ते अवघड होते. पण माझा विश्वास आहे, ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटानंतर लोक यांना म्हणतील की सर आकाश ही तुमच्यासाठी मर्यादा आहे, हा चित्रपट बनवून द्या.”

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Siddharth Statement on crowd of 'Pushpa 2'
‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

पुढे बोलताना अभिनेता म्हणतो, “हा माणूस चित्रपटासाठी वेडा आहे. जर तुम्ही त्यांना ते स्वातंत्र्य दिले तर ते ‘आरआरआर’ सारखा चित्रपट बनवतील. फक्त तुम्ही प्रवीण तरडेंवर विश्वास ठेवला पाहिजे. महत्वाचे म्हणजे, मराठी प्रेक्षकांना हे म्हणायची गरज पडणार नाही की मराठी चित्रपट कमी बजेटचे असतात.” असे म्हणत देव गीलने प्रवीण तरडेंचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: “शाळेसारखं आता शनिवार-रविवारची…”, रितेश देशमुखच्या होस्टिंगवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

याबरोबरच, शूटिंगसाठी पुणे का निवडले? या प्रश्नाचे उत्तर देताना देव गीलने म्हटले, “माझा जन्म पुण्यात झाला. राजमौली सरांनी मला नाव दिले. मला त्यांना आणि त्यांच्या लोकांना एक वेगळा प्लॅटफॉर्म द्यायचा होता. जसं राजमौली सरांनी मला हैदराबाद हा प्लॅटफॉर्म दिला. तसं मला तेलुगु प्रेक्षकांना महाराष्ट्रातील एक प्लॅटफॉर्म द्यायचा होता. त्यामुळे त्यांच्या टीमला मी पुण्यात आणले आणि संपूर्ण स्थानिक कलाकारांबरोबर हा चित्रपट पुण्यात बनवला. हे माझं सौभाग्य आहे की, ज्या टीमने मला उभारण्यात मदत केली होती. मी त्यांना पुण्यात आणून त्यांच्याबरोबर पहिला मराठी चित्रपट बनवला.”

‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात प्रवीण तरडे मुख्य खलनायकाची भूमिकेत दिसणार असून हा त्यांचा पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट आहे. त्यांच्याबरोबर, तेजस्विनी पंडीत ही मराठी अभिनेत्री देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ३० ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. आता एका नवीन भूमिकेत प्रवीण तरडे प्रेक्षकांचे मन जिंकून घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader