लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते अशा तिहेरी भूमिकेमधून प्रवीण तरडे प्रेक्षकांसमोर आले. त्यांचा शेवटचा प्रदर्शित झालेला ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डूपर हिट ठरला. मराठीमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये प्रवीण तरडे यांचं नाव सर्वात पुढे आहे. त्याचबरोबरीने आपण उत्तम दिग्दर्शक असल्याचंही त्यांनी सिद्ध करून दाखवलं. ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटानंतर ते शेतीच्या कामामध्ये रमले होते. पण आता पुन्हा एकदा प्रवीण यांनी आपल्या नव्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली आहे.
कलाक्षेत्रामध्ये काम करणं हा आपला काही कायमचा व्यवसाय नाही. शेती हाच आपला व्यवसाय असं प्रवीण कायम सांगत आले आहेत. म्हणूनच एखादा चित्रपट झाल्यानंतर पुढे काही काम नसताना ते गावकडे जातात. शेतीच्या कामामध्ये रमतात. आता सध्या तरी शेतीची काम उरकून ते जीममध्ये घाम गाळताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
प्रवीण यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे जीममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते व्यायाम करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत असताना त्यांनी म्हटलं की, “नवी मोहीम नवी जोखीम” प्रवीण यांचा बदलेला लूकही यामध्ये दिसत आहे. त्यांचे वाढलेले केस, मिशी व लूक विशेष लक्षवेधी ठरत आहे.
प्रवीण यांचा हा व्हिडीओ पाहून त्यांच्या चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. नवीन कोणता चित्रपट येत आहे?, नव्या मोहिमेसाठी खूप शुभेच्छा असं त्यांच्या चाहत्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांच्या या व्हिडीओला हजारो व्ह्युज मिळाले आहेत. प्रवीण यांचा हा व्हिडीओ पाहून ते त्यांच्या आगामी चित्रपटाची जोरदार तयारी करत असल्याचं दिसून येत आहे.