अयोध्येत नुकताच प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा ( २२ जानेवारी ) पार पडला आहे. यानिमित्त सध्या अयोध्या नगरीसह संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आज ठिकठिकाणी श्री प्रभू रामाचे पूजन करण्यात येत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील त्यांच्या राहत्या घरी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. याचा सुंदर व्हिडीओ त्यांच्या पत्नी स्नेहल यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्नेहल यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अयोध्येच्या राममंदिराची प्रतिकृती असलेली सुंदर रांगोळी, पारंपरिक सजावट व अध्यात्मिक वातावरणात तरडे कुटुंबात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओला खास कॅप्शन देत स्नेहल यांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं महत्त्व सांगितलं आहे.

हेही वाचा : “आपल्या पुढच्या पिढ्यांच्या…”, किरण मानेंची मराठा आरक्षणासाठी पोस्ट; म्हणाले, “दुसऱ्याच्या ताटातला घास…”

स्नेहल तरडे यांची पोस्ट

सीतापती प्रभू श्रीरामचंद्र यांस साष्टांग दंडवत
प्रभू, त्रेतायुगात तुम्ही १४ वर्षे वनवास भोगला आणि या घोर कलियुगाने मात्र तुम्हाला तब्बल ४९६ वर्षांसाठी वनवासात धाडले. यासाठी काळ तुमचा क्षमाप्रार्थी आहे. परंतु, ज्याप्रमाणे त्रेतायुगीन वनवासात तुम्हाला अनेक भक्तांनी यथाशक्ती सर्वतोपरी मदत केली, प्रसंगी प्राणांचे बलिदान दिले त्याचप्रमाणे कलियुगातही अनेक वीर भक्तांनी रामकार्यासाठी जीवन समर्पित केले. नि:शस्त्र भक्तांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला त्यावेळी प्राणांची आहुती दिलेल्या भक्तांच्या रक्ताने शरयू नदीचे पाणीदेखील लाल झाले. कलियुगातील रामायणाचा हा रक्तरंजित अध्याय संपवून, राक्षसी वृत्तींचा पराभव करुन अखेरीस तुम्ही स्वगृही अयोध्येस परतत आहात… प्रभू तुमचे स्वागत असो! आज आम्हा समस्त सनातन हिंदू धर्मियांना, तुमच्या भक्तांना अपार आनंद होतो आहे. तुम्ही अयोध्येस परत आलात म्हणजे आता या भारतवर्षात रामराज्य पुन्हा सुरु झाले आहे असेच आम्ही सर्वजण मानतो. कलियुगातील या रामराज्यात भारत देश धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक या सर्व स्तरांवर प्रगतीशील होवो, येथे समृद्धी नांदो हीच तुमच्या चरणी प्रार्थना…
सीतापती श्रीरामचंद्र की जय !
सनातन हिंदू धर्म की जय!
यतो धर्मस्ततो जयः

हेही वाचा : “बाळाचा निर्णय…”, स्पृहा जोशीने वैयक्तिक आयुष्याबद्दल मांडलं मत; म्हणाली, “माझ्या माहेरचे अन् सासरचे…”

दरम्यान, प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. यामध्ये बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत, अभिषेक बच्चन, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल, कतरिना कैफ यांचा सहभाग आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin tarde perform prabhu shri ram pran pratishtha pooja at home wife snehal shares special video sva 00