आज देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात पुणे, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत. पुण्यातील निवडणुकीत भाजपाचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व मराठीतील चित्रपट निर्माते व अभिनेते प्रवीण तरडे यांची खूप चांगली मैत्री आहे. दोन दिवसांपूर्वी आपल्या मित्रासाठी प्रचारसभेत भाषण करणाऱ्या प्रवीण तरडेंनी आज मतदानाच्या दिवशी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यांनी फक्त दोनच शब्दांची फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.

“मला त्याबद्दल शून्य इंटरेस्ट…”, सुबोध भावे ‘त्या’ प्रश्नावर स्पष्टच बोलला; अभिनेत्याने पुण्यात केलं मतदान

प्रवीण तरडे फेसबुकवर खूप सक्रिय आहेत. ते फेसबुकवरून चित्रपटांव्यतिरिक्त अनेक सामाजिक, राजकीय गोष्टींबाबत आपली आपली मतं मांडत असतात. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी दोन शब्दांत पोस्ट केली आहे. ‘शहरभर मुरलीधर’ असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या या फेसबुक पोस्टची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

“कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय,” प्रवीण तरडेंचं प्रचारसभेत विधान; म्हणाले, “इथं उपस्थित प्रत्येकाच्या बापजाद्याने…”

प्रवीण तरडेंची पोस्ट

प्रवीण तरडेंनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेला लावली होती हजेरी

प्रवीण तरडेंनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात आयोजित प्रचारसभेत भाषण केलं होतं. “कलाकाराच्या पाठिशी एखाद्या पक्षाने किती ठामपणे उभं राहावं हे या शहरातील प्रत्येक कलाकाराने अनुभवलेलं आहे, त्यामुळे मुरलीधर मोहोळचा मित्र, मुळशीचा सुपुत्र म्हणून मी तुम्हाला एवढंच आवाहन करतो की पुढचे काही वर्ष आपल्याला खंबीर नेतृत्व देईल असं नेतृत्व भाजपाने पुणे शहराला दिलं आहे. त्याला आपल्याला भाजपाचे दिवंगत नेते गिरीश बापट ज्या लीडने जिंकून आले होते त्याच्यापुढे जाऊन जास्त मतदान करा. आपल्या मुरली अण्णाला मोठ्या डौलात दिल्लीत पाठवा. मुळशी तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट मुळशीतून मानगाव मार्गे रायगडला नेली, त्यांच्या पत्रात उल्लेख आहे की अत्यंत प्रामाणिक आणि इमानदार माणसं या भागात राहतात. त्यामुळे ही लूट प्रामाणिकपणे रायगडावर पोहोचली, तो मुळशीतला मावळा आज मोदींनी दिल्लीला पाठवण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे मुळशीचा हा प्रामाणिकपणा सर्वदूर न्यायचा आहे, अशी हात जोडून विनंती,” असं प्रवीण तरडे म्हणाले होते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin tarde post for pune lok sabha bjp candidate murlidhar mohol hrc