रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका असलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत. या चित्रपटाबद्दल अनेक कलाकार आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. मराठी अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाबद्दल पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा आहे.
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. अनेकजण चित्रपटांबद्दल वेगवेगळी मतं मांडत आहेत. रणदीपसह अंकिता लोखंडे व अमित सियाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
॥ धर्मो रक्षिती रक्षित:॥
अफाट अचाट आयुष्य जगलेल्या
जातीपातीला गाडण्यासाठी झटलेल्या
महान व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी गोष्टं
ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा, अशी पोस्ट प्रवीण तरडेंनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी चित्रपटाचं एक पोस्टरही शेअर केलं आहे.
प्रवीण तरडेंच्या या पोस्टवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘तुम्ही पहिले मराठी सिनेअभिनेते आहात ज्यांनी मराठी स्वातंत्र्यसैनिकावर अमराठी माणसाने काढलेल्या मुव्हीबद्दल मत व्यक्त केलंय, अशी कमेंट या पोस्टवर एका युजरने केली आहे.