अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या बिनधास्त, बेधडक स्वभावामुळे कायम चर्चेत असतात. प्रवीण तरडे यांनी ‘रेगे’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ अशा दमदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली होती. परंतु, हा चित्रपट बनवताना प्रवीण तरडेंना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. आर्थिक संकटात असताना मित्रांनी कशी मदत केली याबद्दल प्रवीण तरडेंनी नुकत्याच ‘बोल भिडू’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : Video : “मला नवरा नको गं बाई…”, अमृता खानविलकर सादर करणार भारुड, शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

प्रवीण तरडे मित्रांबद्दल सांगताना म्हणाले, ‘मुळशी पॅटर्न’ बनवताना माझ्याकडे पैसे नव्हते. मी बायकोचे दागिने सुद्धा विकले होते. अशा परिस्थिती माझे मित्र पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. महेश लिमये, उपेंद्र लिमये यांना चित्रपट करताना माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीत असे स्पष्ट सांगितले होते. ‘मुळशी पॅटर्न’ रिलीज झाल्यावर जेव्हा त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला तेव्हा मी महेश आणि उपेंद्रला पैसे दिले. मला त्यांचे मानधन त्या काळात परवडणारे नव्हते.

हेही वाचा : Video: ‘आई कुठे काय करते’फेम ‘या’ अभिनेत्याची पत्नी दिसणार ‘ताली’मध्ये गौरी सावंत यांच्या बालपणीच्या भूमिकेत, पहिली झलक समोर

प्रवीण तरडे पुढे म्हणाले, “‘मुळशी पॅटर्न’ हा माझ्या अत्यंत जवळचा चित्रपट आहे. खिशात पैसे नसताना तो चित्रपट बनवला होता. देवेंद्र गायकवाड (दया भाई ), रमेश परदेशी ( पिट्या भाई ) या माझ्या दोन मित्रांनी आजही ‘मुळशी पॅटर्न’चे पैसे घेतलेले नाहीत. त्यांनी फुकट काम केले आहे. उपेंद्र आणि महेशला अनेक दिवसांनी मी त्यांचे मानधन दिले. जेव्हा लोक मला विचारतात काय तुझ्या चित्रपटात तेच-तेच लोक असतात. पण, ज्या मित्रांनी माझ्या अडचणीच्या काळात फुकट काम केले त्यांना मी कसा विसरू? त्यावेळी हे नट पैशांसाठी अडून बसले असते तर, प्रवीण तरडेने कुठून आणला असता पैसा?”

हेही वाचा : “पुणे शहर सिग्नलला उभं असतानाही…”, चिन्मय मांडलेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“अभिनेते म्हणून हे सगळे कलाकार खूप मोठे आहेत. या माझ्या मित्रांनी कठीण काळात मला खंबीरपणे साथ दिली. त्यांच्यामुळे ‘मुळशी पॅटर्न’ बनला. उप्या, दया, पिट्या या माझ्या मित्रांच्या अभिनयाबद्दल मी काय बोलणार ते बेस्ट अभिनेते आहेत. पुरुषोत्तम करंडकमध्ये यांचा सन्मान झाला आहे अजून मी त्यांच्याबद्दल काय बोलणार? मुळशी पॅटर्न पुन्हा होणे नाही…म्हणून मला सगळेजण आज मित्रांचा दिग्दर्शक म्हणून ओळखतात” असे प्रवीण तरडे यांनी सांगितले.

Story img Loader