कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांतील भूमिकांमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता प्रवीण तरडेंनी एका मुलाखतीदरम्यान ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारण्याचा अनुभव सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले प्रवीण तरडे?

‘अल्ट्रा बझ मराठी’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडेंनी ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटातील भूमिकेबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणतात, “दाक्षिणात्य चित्रपटाची भुरळ जगभर आहे. जगभरात चर्चा असते की राजामौलींचा कोणता चित्रपट येणार आहे. ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटाचे दिग्दर्शक कोटीगारू हे राजामौली सरांचे बाहुबली चित्रपटाचे सह दिग्दर्शक होते. जेव्हा माझ्याकडे हा चित्रपट आला आणि मला भूमिकेसाठी विचारणा झाली, त्यावेळी माझ्या मनात चित्रपटाच्या भव्यतेविषयी कोणतीही शंका नव्हती.”

पुढे बोलताना ते म्हणतात, “माझ्या पहिल्याच दाक्षिणात्य चित्रपटात मला मुख्य खलनायकाची भूमिका देण्यात आली, ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळी माझा गेटअप पाहिला, माझे कपडे पाहिले तेव्हा मला आनंद झाला. कारण याआधी मला स्वत:ला असं कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे हा चित्रपट करताना मला मजा आली”, असे प्रवीण तरडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: ‘दुर्गा’ मालिका मिळाल्यावर अंबर गणपुळेच्या होणाऱ्या पत्नीची होती ‘ही’ प्रतिक्रिया, शिवानी सोनार म्हणाली, “आता तू माझ्या…”

याबरोबरच प्रवीण तरडेंनाच खलनायकाची भूमिका का दिली गेली, असा प्रश्न विचारला असता, अभिनेता देव गिल म्हणाला, “लॉकडाऊनमध्ये प्रवीण तरडेंचा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट पाहिला होता, त्यानंतर मी त्यांना जाऊन भेटलो. त्यावेळी मी त्यांचा चित्रपटाविषयी वेडेपणा पाहिला होता. तेव्हा वाटलं की, भविष्यात मी यांच्याबरोबर काम केलेच पाहिजे”, असे अभिनेत्याने म्हटले आहे.

‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात प्रवीण तरडेंशिवाय मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता ३० ऑगस्टला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार आणि प्रवीण तरडेंची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच, प्रविण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे २’ हा चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin tarde said i never look myself like that main villain role in aho vikramaarka movie nsp