शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा मराठी चित्रपट २८ एप्रिल रोजी राज्यभर प्रदर्शित झाला. शाहीरांचे नातू केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात शाहीरांची भूमिका अंकुश चौधरीने साकारली आहे, तर या चित्रपटात सना शिंदेने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. अभिनेता प्रवीण तरडेंनी फेसबूकवर पोस्ट करत चित्रपटाचं व टीमचं कौतुक केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Maharashtra Shaheer Review : पूर्वार्ध खेचलेला, पण उत्तरार्धात प्रेक्षकांवर पकड घेणारा ‘महाराष्ट्र शाहीर’ नेमका कसा आहे? जाणून घ्या

“‘महाराष्ट्र शाहीर’ तुमचा आमचा सिनेमा..
एखादी बायोपिक करणं हेच मुळात शिवधनुष्य असतं आणि त्यात जर ती घरातल्याच माणसावर असेल तर काय घेऊ आणि काय नको, असं होण्याची जास्त शक्यता असते. पण ती शक्यता टाळून केदारने शाहीर साबळेंचे आयुष्य काय वेगवान पध्दतीने उलगडलंय.. हॅट्सऑफ मित्रा.. अंकुश चौधरी हा माणुस आणखी किती वर्ष प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पाडणार आहे.. तू अफलातून शाहीर वठवलाय मित्रा, ते करताना फक्तं अनुभवच नाही तर मेहनतसुध्दा दिसतीये तुझी.. सना खुपच गोड दिसली आणि जणु काही तिचा दहावा सिनेमा असावा ईतका सराईत अभिनय पहिल्याच चित्रपटात केलाय.. छोट्या मोठ्या भुमिका करणारे सगळेच भन्नाट. सर्वात छोटा शाहीर एकदमच खतरनाक ठरला.. शुभांगी सदावर्ते भन्नाट, अक्षय टाकचा राजा मयेकर भारी.. निर्मिती सावंत यांनी धमाल केलीये..
शाहीर साबळेंच्या कार्यकर्तृत्वाला सलाम
केदार आणि अंकुश ला फाईव्ह स्टार रेटींग
नक्की बघा आपला महाराष्ट्र शाहीर,”
अशी पोस्ट प्रवीण तरडे यांनी केली आहे.

दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचे शाहीर साबळे आजोबा आहेत. केदार शिंदेंच्या आईचे ते वडील होते. केदार शिंदेंची लेक सनाचे शाहीर साबळे पणजोबा आहेत. एकंदरीतच ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. मराठी कलाकार हा चित्रपट पाहिल्यानंतर कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin tarde special post for maharashtra shaheer ankush chaudhari kedar shinde and team calls it our movie hrc