अभिनेते प्रवीण तरडे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बलोच’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन यात घडणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा रोमांचक टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. त्यानंतर आता या चित्रपटातील पहिलेवहिले प्रेमगीत प्रदर्शित झाले आहे.

‘बलोच’ या चित्रपटाच्या पोस्टर, टीझरमध्ये प्रवीण तरडे एका लढवय्याच्या रूपात पाहायला मिळत आहेत. पण या गाण्यात त्यांची एक वेगळीच बाजू पाहायला मिळत आहे. ‘खुळ्या जीवाला आस खुळी’ असे या गाण्याचे बोल आहेत.
आणखी वाचा : “पानिपत ही मराठ्यांची शेवटची लढाई नव्हती…” प्रवीण तरडेंच्या बहुचर्चित ‘बलोच’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

या प्रेमगीतात नजरेतून प्रेमाच्या तरल भावना व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत. तसेच यातून मिश्र भावनांचं सुरेख गुंफण दिसत आहे. नवरा -बायकोमधील विलक्षण प्रेमही यात पाहायला मिळत आहे. तसेच एकाच वेळी आपल्या योद्धा नवऱ्याला खंबीर पाठिंबा देत असतानाच स्वारीवर जाण्यासाठी सज्ज झालेल्या आपल्या नवऱ्याला निरोप देताना अस्वथ झालेली पत्नीही पाहायला मिळत आहे.

‘बलोच’ या चित्रपटात प्रवीण तरडे यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री स्मिता गोंदकर साकारत आहे. प्रवीण तरडे आणि स्मिता गोंदकर यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. स्मिता गोंदकर या गाण्यातून पहिल्यांदाच अशा अंदाजात दिसत आहे.

आणखी वाचा : सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा मोठ्या पडद्यावर अवतरणार, प्रवीण तरडेंच्या बहुचर्चित ‘बलोच’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

‘आस खुळी’ असे या गाण्याचे बोल असून या श्रवणीय गाण्याला श्रेया घोषाल हिने स्वरबद्ध केले आहे. तर मनातील भावना अभिव्यक्त करणाऱ्या या सुमधुर गाण्याला गुरु ठाकूर यांचे शब्द लाभले आहे. तर नरेंद्र भिडे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या ‘बलोच’ चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

Story img Loader