Pravin Tarde : प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर २ हा सिनेमा २७ सप्टेंबरला (शुक्रवार) प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या सिनेमाबाबत एक पोस्ट केली आहे. त्यांनी यासंदर्भात दिग्दर्शक प्रवीण तरडेंवर जोरदार टीका केली आहे. या टीकेला प्रवीण तरडेंनी ( Pravin Tarde ) रोखठोक उत्तरही दिलं आहे. या चित्रपटात एकनाथ शिंदेंच्या बंडाचा प्रसंग आहे. या प्रसंगावरुन आणि इतर प्रसंगांवरुन शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना खडे बोल सुनावले. सुषमा अंधारेंनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट लिहून प्रवीण तरडेंवर हल्लाबोल केला होता, याबाबत बोलताना आता तरडेंनी उत्तर दिलं आहे. धर्मवीर २ हा सिनेमा आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट या टॅगलाईनने तयार करण्यात आला आहे.

काय आहे सुषमा अंधारेंची पोस्ट?

शिवसेनेत माझा प्रवेश हा गद्दारी झाल्यानंतर म्हणजे २८ जुलै २०२२ ला झाला.पण मतांसाठी निवडणुकिसाठी थुकरट युक्ती तरडेंनी दाखवली आहे. एकनाथ शिंदे सांगताहेत गद्दारीचं एक कारण सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या..!! प्रवीण तरडेजी ( Pravin Tarde ) कलेशी बेईमानी म्हणतात ती हीच का?, अशी पोस्ट अंधारे यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्सवरती लिहली आहे. प्रवीण तरडेंनी कलेशी बेईमानी केल्याचा आरोप या पोस्टमधून त्यांनी केला आहे. सुषमा अंधारेंच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मात्र याबाबत जेव्हा प्रवीण तरडेंना ( Pravin Tarde ) विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी थेट उत्तर दिलं आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

हे पण वाचा- ‘धर्मवीर २’ ची दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी; ठरला यंदाचा सर्वाधिक ओपनिंग करणारा मराठी सिनेमा

प्रवीण तरडे नेमकं काय म्हणाले?

“सुषमा अंधारेंनी बहुदा सिनेमा पाहिला नाही. त्यांनी कुणाकडून ऐकलं असेल. त्यांनी सिनेमा पाहिला आणि तो संवाद नीट ऐकला तर त्यांना समजेल. मुळात मी त्या संपूर्ण सीनमध्ये कुणाचं नावच घेतलेलं नाही. मलाही आश्चर्य वाटलं की सुषमाताई असं बोलल्या. सुषमा अंधारे एका राजकीय पक्षाचं काम करतात, मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी सिनेमा पाहावा. सिनेमा पाहिला तर त्यांना प्रश्नच पडणार नाही. चित्रपट विरोधकांनी पाहिला तर त्यांनाही तो आवडेल कारण ती आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची, बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे. आम्ही सिनेमा बनवला आहे. बाकी कुठल्या गोष्टीशी आमचा संबंध नाही. सिनेमा पाहिला तर हा प्रश्न पडणार नाही. सिनेमा पाहिला नाही तर अनेक प्रश्न पडतील.” असं म्हणत प्रवीण तरडेंनी ( Pravin Tarde ) सुषमा अंधारेंना उत्तर दिलं आहे.

Dharmveer 2 Movie
धर्मवीर २ मधल्या प्रसंगावरुन सुषमा अंधारेंचा आरोप, प्रवीण तरडेंचं उत्तर (फोटो सौजन्य-प्रवीण तरडे, फेसबुक पेज)

धर्मवीर २ मध्ये आनंद दिघे, त्यांचं हिंदुत्व इथपासून ते एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड आणि त्यानंतरचा त्यांचा प्रवास काय होता ते दाखवण्यात आलं आहे. या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आता त्यावरुन आरोप केले जात आहेत. संजय राऊत यांनीही या सिनेमावर बोगस असल्याची टीका केली आहे. तर सुषमा अंधारे यांनीही प्रवीण तरडेंना ( Pravin Tarde ) सुनावलं आहे. मात्र आता प्रवीण तरडेंनी विरोधकांनीही सिनेमा पाहिला तर त्यांना तो आवडेल असं म्हटलं आहे.

Story img Loader