‘प्रेमाची गोष्ट’ या छोट्या पडद्यावरील मालिकेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या मालिकेद्वारे अनेक दिग्गज कलाकार छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. यामध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘मुक्ता’, तर अभिनेता राज हंचनाळे ‘सागर’ हे पात्र साकारणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ताच्या आईची भूमिका अभिनेत्री शुभांगी गोखले साकारणार आहेत. त्यांनी आजवर छोट्या पडद्यावरच्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.

हेही वाचा : “आईच्या मृत्यूला आदिल जबाबदार”, राखी सावंतच्या भावाचे गंभीर आरोप; म्हणाला, “तिचे अश्लील व्हिडीओ काढून…”

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली

मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये शुभांगी गोखले मुक्तासाठी मुलगा शोधताना दिसतात. यावरुन त्यांना नुकत्याच एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. “खऱ्या आयुष्यात तुम्ही तुमच्या मुलीसाठी अर्थात सखीसाठी लग्नाचं स्थळ शोधलंय का?” या प्रश्नाला उत्तर देत शुभांगी गोखले म्हणाल्या, “सखीचं लग्नाचं वय झाल्यावर मी काही मुलांचा विचार करून ठेवला होता परंतु, प्रत्यक्षात तशी वेळच आली नाही कारण, तिनं मला सुव्रतबद्दल सांगितलं…त्यानंतर तो आमच्या घरी राहायलाच आला.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातसाठी सासूबाईंनी केला खास बेत, अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत

शुभांगी गोखले जावयाबरोबर असलेल्या नात्याविषयी सांगताना म्हणाल्या, “मुलीचं पुढचं आयुष्य सुखाचं जावं अशी प्रत्येक आईची इच्छा असते. लेकीला चांगला जोडीदार मिळावा ही एकच भावना मनात होती आणि ती पूर्ण झाली. सुव्रत आणि माझं छान पटतं, आमच्यात चांगलं बॉन्डिंग आहे… आता अनेकदा आमच्या दोघांची एक टीम होते आणि आम्ही दोघं मिळून सखीला खूप त्रास देतो.”

हेही वाचा : ‘तुझं माझं ब्रेकअप’ फेम अभिनेत्रीचं खऱ्या आयुष्यात ‘जुळलं’, बॉयफ्रेंडबरोबर शेअर केले फोटो

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका येत्या ४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका संध्याकाळी ८ वाजता पाहता येणार आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान, अपूर्वा नेमळेकर, राज हंचनाळे, शुभांगी गोखले, ईशा परवडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

Story img Loader