‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप व अभिनेता प्रथमेश परब यांचा काही महिन्यांपूर्वी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं ना होतं ‘डिलिव्हरी बॉय’. या चित्रपटात दोघं प्रमुख भूमिकेत झळकले होते आणि त्यांच्या सोबतीला अभिनेत्री अंकिता लांडेपाटील होती. ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटातील पृथ्वीक व प्रथमेशच्या कामाचं चांगलंच कौतुक झालं. त्यानंतर आता दोघांनी मित्रांबरोबर केलेल्या डान्स व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून त्यांचं कौतुक केलं जात आहे.
‘एवी डान्स अकॅडमी’ या इन्स्टाग्राम पेजवर अभिनेता पृथ्वीक प्रताप, प्रथमेश परबचा मित्रांबरोबर भन्नाट डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत पृथ्वीक, प्रथमेश आणि मनमीत पेम आपल्या मित्रांबरोबर दाक्षिणात्य सुपरस्टार फदाह फासिलच्या ‘इलुमिनाटी’ गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत. हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत असून अनेक जण यावर डान्स करत आहेत. त्याप्रमाणेच पृथ्वीक, प्रथमेश आणि मयुरेश पेम आपल्या मित्रांबरोबर डान्स केला आहे. हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस पडला आहे.
हेही वाचा – ‘बिग बॉस १६’ विजेता रॅपर MC Stanला झालंय तरी काय? आधी केली देवाकडे मृत्यूसाठी प्रार्थना आता म्हणतोय…
अभिनेत्री रेशम श्रीवर्धन, तन्वी बर्वे, शिवाली परब, अंकिता लांडेपाटील, पूर्णिमा डे, अपूर्व रांजनकर, विकास पाटील अशा अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच “कडक”, “खतरनाक”, “व्वा”, “तुम्ही मनं जिंकली”, “होऊन जाऊ दे”, “जबरा”, “इन्स्टाग्रामवर आग लावली”, “सुपर”, “क्या बात है”, अशा अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर उमटल्या आहेत.
हेही वाचा – “बाळा, तुला जाऊन ७३० दिवस…” सिद्धू मुसेवालाच्या आईची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “शत्रूंनी माझा एकुलता एक…”

पृथ्वीक प्रताप, प्रथमेश परबच्या या डान्स व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून २२ हजार हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. तर २००हून अधिक जणांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.