बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाचा नवा प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या प्रोजेक्टमध्ये काही मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. या मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दियाच्या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिया मिर्झाची ‘पन्हं’ या नावाची नवीन शॉर्ट फिल्म भेटीस येत आहे. या शॉर्ट फिल्मची दिया ही निर्माती असून यामध्ये बरेच मराठी कलाकार झळकणार आहे. यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. “हृदयाच्या कोपऱ्यातला अत्यंत लाडका प्रोजेक्ट..’पन्हं'”, असं कॅप्शन लिहीत त्याने काही फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा – स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ नव्या मालिकेत लाडक्या भावोजीचा लेक सोहम बांदेकर असणार महत्त्वाच्या भूमिकेत

याशिवाय पृथ्वीकसह अभिनेत्री सायली संजीव देखील दियाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तिने देखील इन्स्टाग्राम स्टोरीवर या प्रोजेक्टसंबंधित पोस्ट शेअर केली आहे. “या प्रोजेक्टचा एक भाग होण्याचा मला खूप आनंद आहे,” असं लिहून तिने एक फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेता झळकला ‘नवरी मिळे हिटलरला’ नव्या मालिकेत, साकारतोय ‘ही’ महत्त्वाची भूमिका

पृथ्वीक प्रताप व सायली संजीवबरोबर अभिनेता सुहास शिरसाट देखील ‘पन्हं’ या शॉर्ट फिल्ममध्ये झळकणार आहे. यासंदर्भात सुहासने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. “एका दमदार टीमबरोबर नवीन काम”, असं लिहितं अभिनेत्याने क्लॅपचा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, दिया मिर्झाची ही शॉर्ट फिल्म काय आहे? कधी प्रदर्शित होणार? आणखी कोणते कलाकार पाहायला मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या काळात समोर येतील.