मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये प्रियाने आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या एकाबाजूला मराठी रंगभूमी गाजवत असताना दुसऱ्या बाजूला प्रियाचे हिंदी चित्रपट, वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अशा हरहुन्नरी अभिनेत्रीच्या लग्नाचा आज १३वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने प्रियाने खास पोस्ट लिहिली आहे; जी सध्या व्हायरल झाली आहे.

अभिनेत्री प्रिया बापटने पती, अभिनेता उमेश कामतबरोबर दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत प्रियाने लिहिलं आहे, “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज लग्नाला १३ वर्षे झाली आणि आपण २० वर्षे एकत्र राहत आहोत…हे खूप प्रेम, हसणं आणि विचारणं रात्रीच्या जेवणासाठी काय हवं आहे?”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री, सलमान खानला हसू झालं अनावर, घरात राहणार गाढवाबरोबर! पाहा प्रोमो

प्रिया बापटच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडे, समिधा गुरू, मेघना एरंडे, पल्लवी पाटील, आशिष पाटील, मनिष पॉल, सोनाली खरे अशा अनेक कलाकारांनी प्रिया आणि उमेशला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच “जोडी असावी तर अशी…सर्वात आनंदी जोडी”, “असेच एकत्र राहा”, “तुम्ही आमची आवडती जोडी आहात”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – Raat Jawaan Hai Promotion: भिन्न प्रकृतीची चारही माध्यमे वैशिष्ट्यपूर्ण; अभिनेत्री प्रिया बापटचे मत

हेही वाचा – “अरबाज घाणेरडा गेम खेळला…”, घरात पुन्हा एन्ट्री घेतल्यावर वैभवचं विधान! जान्हवीला म्हणाला…

दरम्यान, प्रिया बापटच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तिची नवी हिंदी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘रात जवान है’, असं तिच्या हिंदी वेब सीरिजचं नाव असून यामध्ये प्रियासह बरुण सोबती, अंजली आनंद असे बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. ११ ऑक्टोबरला प्रियाची नवी सीरिज ‘सोनी लिव्ह’वर प्रदर्शित होतं आहे. तसंच प्रिया आणि उमेशचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. येत्या काळात या नाटकाचे प्रयोग मुंबई आणि पुण्यात असणार आहेत. याशिवाय उमेशचा ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित होतं आहे.

Story img Loader