मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये प्रियाने आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या एकाबाजूला मराठी रंगभूमी गाजवत असताना दुसऱ्या बाजूला प्रियाचे हिंदी चित्रपट, वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अशा हरहुन्नरी अभिनेत्रीच्या लग्नाचा आज १३वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने प्रियाने खास पोस्ट लिहिली आहे; जी सध्या व्हायरल झाली आहे.
अभिनेत्री प्रिया बापटने पती, अभिनेता उमेश कामतबरोबर दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत प्रियाने लिहिलं आहे, “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज लग्नाला १३ वर्षे झाली आणि आपण २० वर्षे एकत्र राहत आहोत…हे खूप प्रेम, हसणं आणि विचारणं रात्रीच्या जेवणासाठी काय हवं आहे?”
प्रिया बापटच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडे, समिधा गुरू, मेघना एरंडे, पल्लवी पाटील, आशिष पाटील, मनिष पॉल, सोनाली खरे अशा अनेक कलाकारांनी प्रिया आणि उमेशला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच “जोडी असावी तर अशी…सर्वात आनंदी जोडी”, “असेच एकत्र राहा”, “तुम्ही आमची आवडती जोडी आहात”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.
हेही वाचा – Raat Jawaan Hai Promotion: भिन्न प्रकृतीची चारही माध्यमे वैशिष्ट्यपूर्ण; अभिनेत्री प्रिया बापटचे मत
हेही वाचा – “अरबाज घाणेरडा गेम खेळला…”, घरात पुन्हा एन्ट्री घेतल्यावर वैभवचं विधान! जान्हवीला म्हणाला…
दरम्यान, प्रिया बापटच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तिची नवी हिंदी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘रात जवान है’, असं तिच्या हिंदी वेब सीरिजचं नाव असून यामध्ये प्रियासह बरुण सोबती, अंजली आनंद असे बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. ११ ऑक्टोबरला प्रियाची नवी सीरिज ‘सोनी लिव्ह’वर प्रदर्शित होतं आहे. तसंच प्रिया आणि उमेशचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. येत्या काळात या नाटकाचे प्रयोग मुंबई आणि पुण्यात असणार आहेत. याशिवाय उमेशचा ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित होतं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd