Priya Bapat & Umesh Kamat New Home : प्रिया बापट व उमेश कामत यांच्याकडे मराठी मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. लग्नाआधी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये प्रिया-उमेशने लग्नगाठ बांधली. मराठमोळ्या पद्धतीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. हे सेलिब्रिटी कपल चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या जोडीने त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

प्रिया व उमेश यांनी नवीन घर घेतलं आहे. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा अभिनेत्रीने नव्या घरातील फोटो शेअर करत दिल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून प्रिया-उमेशच्या घरी इंटिरियरचं काम चालू होतं. तेव्हापासूनच या जोडप्याचं नवीन घर पाहण्याची चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर गुढीपाडव्याच्या फोटोंमध्ये प्रिया-उमेशच्या नव्या घराची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे.

प्रियाने आठवड्याभरापूर्वीच पोस्ट शेअर करत, “आमच्या नवीन घरातील पहिला गुढीपाडवा” असा उल्लेख केला होता. त्यामुळे या जोडप्याच्या चाहत्यांनी नव्या घरासाठी दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिचं नवीन घर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याच्या कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत.

प्रिया-उमेशचं २०११ मध्ये लग्न झाल्यावर या जोडप्याने नवीन घर खरेदी केलं होतं. याबद्दल उमेश कामत जुन्या मुलाखतीत म्हणाला होता, “२०११ साली माझं आणि प्रियाचं लग्न झालं. त्यानंतर आम्ही घर घेतलं. घर घेतल्यावर आमचा बँक बॅलन्स शून्य झाला होता. यानंतर मात्र आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्यासाठी आम्ही पुन्हा जोमाने काम करु लागलो. पण स्व:कष्टातून मुंबईत स्वत:चं घर घेतल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही.”

Priya Bapat & Umesh Kamat
Priya Bapat & Umesh Kamat

दरम्यान, प्रिया बापट व उमेश कामत यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर या दोघांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये एकत्र काम केलेलं आहे. सध्या ही जोडी रंगभूमीवरील ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात एकत्र काम करत आहे.