प्रेक्षकांची लाडकी आणि आवडती जोडी म्हणून प्रिया बापट आणि उमेश कामत यांना ओळखलं जातं. सध्या हे दोघंही ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या निमित्ताने चर्चेत आहेत. या नाटकाची संपूर्ण टीम पुढील काही प्रयोगांसाठी लंडनला पोहोचली आहे. सध्या कलाकारमंडळी लंडनमधील सुंदर फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच प्रिया-उमेशचा एक मजेशीर व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे.

प्रिया-उमेशने लंडन ब्रिज जवळचा एक मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या जोडप्याचं एका व्यक्तीशी भांडण जुंपणार आहे. आता हे भांडण का होणार, व्हिडीओमध्ये नेमकं काय घडतंय? हे जाणून घेऊयात…

हेही वाचा : “सॉरी, मला पास्ता अन् ही मुलगी…”, खोचक कमेंट करणाऱ्या नेटकऱ्याला मिताली मयेकरचं स्पष्ट उत्तर, म्हणाली, “तुम्हाला…”

प्रिया बापट लंडनच्या रस्त्यावर एकटीच उभी असते. व्हिडीओमध्ये तिला वातावरणामुळे थोडासा गारवा जाणवत असल्याचं पाहायला मिळतंय. यानंतर ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा प्रकाशयोजनाकार अमोघ फडके त्याठिकाणी येतो आणि प्रियाला थंडी वाजतेय म्हणून जॅकेट देतो. याचवेळी व्हिडीओमध्ये उमेश कामतची एन्ट्री होते. तो प्रियाकडे हात करून सांगतो, “ये मेरा हैं” तर, अमोघ प्रियाने घातलेलं जॅकेट दाखवत सांगतो “पर, ये तो मेरा हैं ना?” यावरूनच उमेश आणि अमोघ या दोघांमध्ये भांडण जुंपल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अर्थात हा मजेशीर व्हिडीओ आहे त्यामुळे नेटकऱ्यांनी सुद्धा यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘शिवा’ फेम अभिनेत्री म्हणजेच अमोघची पत्नी पूर्वा फडकेने यावर “हट…” अशी कमेंट करत पुढे हसण्याचे इमोजी जोडले आहे. आरती मोरे, आदित्य सरपोतदार, अहाना खुराना, आकांक्षा गाडे आदी कलाकारांनी कमेंट्स करत या प्रिया, उमेश आणि अमोघ यांचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : सायली अर्जुनची घेणार शाळा! सोज्वळ सुनेचा नवा अवतार पाहून कल्पनाही झाली थक्क, पाहा नवीन प्रोमो

हेही वाचा : “डॅडा, बॉयफ्रेंड आणि फ्रेंडमध्ये काय फरक असतो?” ६ वर्षांच्या लेकीने प्रश्न विचारताच आदिनाथ कोठारेला उत्तर सुचेना, म्हणाला…

दरम्यान, ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे नाटक इरावती कर्णिक यांनी लिहिलं असून, याचं दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केलं आहे.

Story img Loader