प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. लवकरच प्रिया-उमेश ‘जर तरची गोष्ट’या नव्या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जवळपास १० वर्षांनी दोघांनीही पुन्हा एकत्र नाटक करण्याचा निर्णय का घेतला? आणि नवऱ्याबरोबर काम करतानाच्या अनुभवाबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियाने खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Dream Girl 2 Trailer : “४ वर्षांनी ‘पूजा’ परत येणार…”, ‘ड्रीम गर्ल २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, आयुष्मान खुरानाच्या लूकने वेधले लक्ष

प्रिया बापट ‘मज्जा’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “उमेशबद्दल एक कलाकार आणि माणूस म्हणून मला प्रचंड आदर आहे. त्याच्यामध्ये एखाद्याला समजून घेण्याची खूप जास्त क्षमता असल्याने मी त्याच्या या स्वभावाच्या कायम प्रेमात असते. त्याच्याबरोबर काम करणे हा माझ्यासाठी नक्कीच एक आधार असतो कारण, तो नेहमीच मला खूप सांभाळून घेतो.”

हेही वाचा : “गोरेगाव ते ठाणे घोडबंदर रॉक्स…”, मुंबईच्या वाहतूक कोंडीत साडेतीन तास अडकला मराठमोळा अभिनेता, शेअर केली पोस्ट

प्रिया पुढे म्हणाली, “तो एक कलाकार म्हणून माझ्याशी काय-काय शेअर करतो याबद्दल मला खरंच कल्पना नाही. पण, नाटकातील सहकलाकाराआधी तो माझा नवरा आहे. त्यामुळे या नाटकाबद्दलच्या सगळ्या गोष्टी मी त्याच्याबरोबर शेअर करते. आज एवढ्या सहजपणे मी पुन्हा नाटक करण्याचा विचार केला त्याचे एकमेव कारण म्हणजे उमेश कामत. जर या नाटकामध्ये उमेश नसता तर, मी पुन्हा नाटकाकडे वळले असते का हे खरंच माहिती नाही.”

हेही वाचा : अनन्या पांडेबरोबरच्या व्हायरल फोटोंवर आदित्य रॉय कपूरने सोडलं मौन; म्हणाला, “सोशल मीडियावर…”

दरम्यान, ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. नाटकाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे. ५ ऑगस्टपासून या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग सुरु होणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priya bapat on working with husband umesh kamat in drama jar tarchi goshta sva 00